विद्युत प्रवाहाचा धक्का लागून युवकाचा मुत्यू

✒आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा
हिंगणघाट २१/१०/२१
शहरातील संत तुकडोजी वार्ड येथील गणेशनगर येथे ४ युवक घराचे रंगकाम करीत असतांना यापैकी एका युवकाला विद्युत प्रवाहाचा धक्का लागल्याने मुत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज घडली. मृतक युवकाची ओळख शेखर नारायणराव प्रधान(२४) अशी असून तो स्थानीय नेहरू वार्ड येथील रहिवासी आहे.
प्राप्त माहितीनुसार शहरातील तुकडोजी वार्ड येथील गणेशनगर कॉलोनीतील रहिवासी शिक्षक राजु उगेमुगे यांचे घरी ४ युवक रंगरंगोटी करीत होते. यावेळी शेखर प्रधान याला विद्युत प्रवाहाचा जबर धक्का लागून तो गंभीर जखमी झाला,सदर युवकाला तातडीने उपचारासाठी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता शेखरचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सदर प्रकरणी हिंगणघाट पोलिसांत नोंद करण्यात आली असुन पुढील तपास शहर पोलिस करीत आहे.