हिंगणघाट बाजार समितीसह गिमा टेक्सटाइल पार्कमध्ये कापसाची खरेदी सुरू

अक्षय बहादे
समुद्रपुर तालुका प्रतिनिधी
9545555951
हिंगणघाट २१/१०/२१
तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डसह नजिकच्या गिमाटेक्स टेक्सटाइल पार्क येथेसुद्धा कापसाची खरेदी सुरू करण्यात आली आहे. येथून जवळच असलेल्या वेळा येथील गिमाटेक्स टेक्सटाईल पार्क येथे कोणत्याही मध्यस्थाशिवाय कापूस खरेदी होत असल्याने कापूस विक्री करणार्या शेतकर्यांची दलाल, अडत्यापासून होत असलेली लूट थांबलेली आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर पांढर्या सोन्याला बर्यापैकी भाव मिळाला असल्यामुळे शेतकरीसुद्धा समाधानी दिसून येत आहे.
थेट टेक्सटाइल पार्क व शेतकरी यांच्यात सरळ खरेदी-विक्रीचा व्यवहार येथे होत असून शेतकर्याने विक्री केलेल्या कपाशीची मिळालेली रोख रक्कम थेट शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत असल्याची माहिती गिमाटेक्स टेक्सटाइल पार्क वेळा येथील स्थानिक बाजार बाजारपेठेत कापसाची आवक सुरु असून, प्रती क्विंटल 6 हजार 900 ते 7350 भाव कापसाला मिळाला आहे. वेळा येथील टेक्सटाइल पार्क येथे आतापर्यंत 150 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आली असून येथे विक्रीसाठी कापूस आणणार्या शेतकर्यांना 6 हजार 800 ते 7 हजार 151 रुपये प्रती क्विंटल भाव प्राप्त झाला असल्याची माहिती व्यवस्थापक जोशी यांनी दिली. कोणतीही अडत किंवा दलाली न देता कापूस विक्री करण्यासाठी कापूस उत्पादकांनी वेळा टेक्सटाइल पार्क येथे संपर्क साधावा असे आवाहनसुद्धा यावेळी केले आहे.