घोगली येथे माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत वर्षावास संपन्न.

✒युवराज मेश्राम ✒
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
मो. 9923296442
नागपुर:- भगवान बुद्धांच्या काळापासून दर वर्षी पावसाच्या तीन महिन्यात आषाढी पौर्णिमेपासून तर अश्विनी पौर्णिमेपर्यंत वर्षावास हा भन्तेजी करता सुरू असते. भन्तेजी हे उपासक-उपासिका यांना मार्गदर्शन करीत असतात. गेल्या अनेक वर्षापासून घोगली ग्रामवासी वर्षावासाचे उपोसथ करीत असतात या वर्षी मात्र आगळेवेगळे वर्षावास समापण घोगली ग्राम मध्ये झाले. लाँग मार्च चे प्रणेते पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर यांना या वर्षावास च्या निमित्ताने पाचारण करण्यात आले.
वास्तविकता मागील पंधरवड्यात प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर यांची एन्जोप्लास्टी झाली परंतु धम्माच्या कार्य असल्यामुळे कवाडे सरांनी मात्र हजेरी लावली.
सर्वात प्रथम रोडवरील स्थित तथागत भगवान गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पमाला प्राध्यापक कवाडे सरांनी अर्पण केल्या. नंतर शिस्तबद्ध रॅली प्राध्यापक कवाडे सर व आयुष्यमान संजयजी खांडेकर यांच्या नेतृत्वात थोर पुरुषांच्या जय जयकार यांच्या घोषणेने रॅली ही करुणा बुद्ध विहार येथे पोहोचली. करूना बुद्धविहारात प्राध्यापक कवाडे सर यांनी भगवान गौतम बुद्ध व परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुर्तीस पुष्पमाला अर्पण करून सर्व उपासक आणि उपासिकाना प्राध्यापक कवाडे सरांनी त्रिशरण व पंचशील दिले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर होते. त्यांनी धम्मावर जोर दिला व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशावर अनेक उपकार केले या देशाला गुलामीतून काढून प्रकाशाकडे नेण्याचे कार्य परम पूज्य विश्वभुषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले.
आपणा सर्वांना जगातील प्रथम निर्मिती विज्ञानवादी धम्म बाबासाहेबांनी देऊन आपल्यावर अनंत उपकार केले त्याप्रमाणे 22 प्रतिज्ञा पण दिल्या. त्या जर आपण अंगीकारल्या तर माणसाचे जीवन हे सुखमय झाल्याशिवाय राहणार नाही. रात्री ला प्रत्येक व्यक्ती ने भोजनाच्या अगोदर सर्व कुटुंब मिळून वंदना घेतली पाहिजे अशा अनेक महत्त्वपूर्ण बाबीवर कवाडे सर यांनी प्रकाश टाकला.
अनेक वर्षापासून गावकऱ्यांची इच्छा होती की, प्राध्यापक कवाडे सरांना घोगली गावांमध्ये आणायचं आहे. ति इच्छा घोगली वासियांना या वर्षात समापन निमित्ताने पार पडली.
ग्रीनिज बुकात या थोर व्यक्तीची नोंद आहे. सोळा वर्ष नामांतराचे आंदोलन धगधगत ज्यांनी ठेवले ते लाँग मार्च प्रणेते, माजी खासदार, दलित मुक्ती सेनेचे सरसेनापती, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक कवाडे सर यांचे आगमन घोगली ग्राम मध्ये झाले. अन गावकर्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. म्हणून गावकर्यां तर्फे प्राध्यापक कवाडे सरांचे शाल फुल देऊन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे पीडब्ल्यूडी विभागामध्ये नोकरी करून व रिटायरमेंट झाल्यानंतर आजही सामाजिक जाणिवेतून सामाजिक, धार्मिक व राजकीय कार्य करण्याचा ध्यास या माउलीला आहे त्या भागाबाई नारनवरे यांचासत्कार पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर यांनी शाल व पुष्प देऊन केले.
प्राध्यापक कवाडे सर यांनी सर्व उपस्थित उपासिका उपासक यांना वर्षावास निमित्त शुभेच्छा दिल्या. माननीय संजय खांडेकर जिल्ह्याचे पीआरपी चे नेते, त्या प्रमाणे भारतीय बौद्ध महासभेचे तालुका कोषाध्यक्ष राहुलजी वानखेडे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे तालुकाध्यक्ष दादारावजी शिरसाठ हे प्रमुख अतिथी म्हणून होते. त्यांचेसुद्धा स्वागत करण्यात आले . प्रमुख पाहुण्यांचे स्वागत विनोदजी तागडे , जानरावजी तागडे विजयजी गजभिये, पांडुरंग नारनवरे, दिनेश बोरकर यांनी केले हा कार्यक्रम यशस्विता करण्याकरीता करुणा बुद्ध विहार सामाजिक बहुउद्देशीय संस्था घोगली तर्फे रत्नमाला तागडे, अस्मिता तागडे, सुमित्रा तागडे, आम्रपाली तागडे, सविता तागडे, वच्छला तागडे, कौशल गजभिये, मेघा तागडे, बेबीनंदा गजभिये, ज्योती गजभिये, पूर्णीमा हनवते, गायत्री रंगारी, सीमा बोरकर यांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे संचालन भारतीय बौद्ध महासभेचे तालुक्याचे अध्यक्ष अरुणभाऊ वाहाने यांनी केले तर आभार प्रदर्शन भारतीय बौद्ध महासभेचे बंडुजी डोंगरे यांनी केले.