बांधकाम विभागासमोर गिट्टी फेकून खड्यांकडे वेधले शिवसेनेने लक्ष*

47

*बांधकाम विभागासमोर गिट्टी फेकून खड्यांकडे वेधले शिवसेनेने लक्ष*

बांधकाम विभागासमोर गिट्टी फेकून खड्यांकडे वेधले शिवसेनेने लक्ष*
बांधकाम विभागासमोर गिट्टी फेकून खड्यांकडे वेधले शिवसेनेने लक्ष*

राजेंद्र झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपीपरी -खेडी ते गोंडपिपरी महामार्गाचे काम गेल्या तीन वर्षापासून संथगतीने सुरू आहे वढोली ते गोंडपिपरी मार्गावर पन्नासच्या वर खड्डे पडले असून मुख्य मार्गाची दयनीय अवस्था झाली आहे.सोबतच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गिट्टी पसरली आहे परिसरातील नागरिकांसह विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसत आहे अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली असून अनेकांना अपंगत्व आले तर अनेकांना जीवही गमवावा लागत आहे . सबंधित विभागाचे अधिकारी सुस्त असल्याचा आरोप करीत शिवसेना तालुका प्रमुख सूरज माडूरवार यांच्या नेतृत्वात बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर गिट्टी फेकण्यात आली.यावेळी प्रशासनाविरोधात नारे लावत कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाई करत तातडीने सगळे खड्डे बुजवावीत अशी मागणी करण्यात आली.आंदोलनादरम्यान विवेक राणा,तुकाराम सातपुते,नबात सोनटक्के,शुभम भोयर,प्रवीण सोनटक्के,राहुल मेकर्तीवार, जितेंद्र लोडे, मंगेश गेडाम,मंगेश चंद्रगिरीवार यांची उपस्थिती होती.दहा दिवसात खड्डे बुजवून गिट्टी साफ न केल्यास बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर पन्नास खड्डे खोदु असा इशारा शिवसेना तालुका प्रमुख सुरज माडुरवार यांनी निवेदनातून दिला आहे.