*नागभिड नगर परिषद प्रभाग 2 व 5 मध्ये शिव संपर्क अभियाना अंतर्गत मीटिंग चे आयोजन

✒अरुण भोले✒
नागभीड तालुका प्रतिनिधी
94033 21731
नागभीड : -दिनांक 23/10/2021 ला नागभि ड नगर परिषद प्रभाग 2 व 5 मध्ये शिव संपर्क अभियाना अंतर्गत मीटिंग घेऊन शिवसैनिकांना येणाऱ्या नगर परिषद निवडणुकीसाठी तत्पर राहायला सांगून व आमचे पक्ष प्रमुख व लाडके मुख्यमंत्री यांचे विचार घरा घरात पोहचविण्यासाठी घर तिथे शिवसैनिक गाव तिथे शाखा ही संकल्पना घेऊन लोकांपर्यंत पोहचवा व शिवसेनेचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी सज्ज व्हावे या साठी मार्गदर्शन केले. या मीटिंग साठी भोजराज भाऊ ज्ञान बोणवर शिवसेना तालुका प्रमुख श्रीकांत पिसे शहर प्रमुख मनोज भाऊ लडके उप तालुका प्रमुख नंदू खापर्डे उप शहर प्रमुख ईश्वर नागरिकर उप शहर प्रमुख श्याम सुंदर खंदारे विभाग प्रमुख परवेज सबरी उप विभाग प्रमुख प्रमोद भाऊ राऊत उप विभाग प्रमुख मुरली कोसरे माझी उप शहर प्रमुख व प्रभाग क्र.2 व 5 मधील शाखा प्रमुख उप शाखा प्रमुख व शिवसैनिक उपस्थित होते.