हिंगणघाट नगरपरिषद सार्वत्रीक निवडणुकच्या अनुसंघाने शिवसेनेची बैठक संपन्न.

✒मुकेश चौधरी ✒
उप संपादक मिडिया वार्ता न्युज
9766445348
हिंगणघाट:-दि.23 ऑक्टोबर रोजी शनिवारला शिवसेना हिंगणघाट शहराच्या वतिने शासकीय विश्राम गृह हिंगणघाट येथे पदाधिकारी व शिवसैनिकांची बैठक उपजिल्हा प्रमुख राजेंद्र खुपसरे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच हिंगणघाट शहर प्रमुख सतिश ढोमणे यांच्या नेतृत्वात घेण्यात आली.
शिवसेना नेते खासदार श्री. गजाननजी किर्तीकर पुर्व विदर्भ संपर्क प्रमुख यांच्या आदेशाने व वर्धा जिल्हा संपर्क प्रमुख माजी खासदार श्री.अनंतराव गुढे यांच्या मार्गदर्शनात पक्ष बांधणी पक्ष संघटन व येणार्या नगरपरिषद सार्वत्रीक निवडणुक डोळ्या समोर ठेवुन पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री (महाराष्ट्र राज्य) यांच्या आदेशानुसार “गांव तेथे शाखा घर तेथे शिवसैनिक” हा मंत्र जोपासुन हिंगणघाट शहरात पक्ष बळकट करण्याकरिता तालुका प्रमुख सतिश धोबे (नगरसेवक) व उप तालुका प्रमुख प्रकाश अनासने यांनी या बैठकीला मार्गदर्शक केले.
या वेळी बैठकीला प्रमुख उपस्थिती श्रीधर कोटकर (नगरसेवक) मनिष देवढे (नगरसेवक), भाष्कर ठवरी (नगरसेवक), मनोज वरघणे (‘नगरसेवक), शंकर मोहमारे (माजी नगरसेवक) देवेन्द्र पडोळे (माजी नगरसेवक) उपशहर प्रमुख गजानन काटवले, जयकुमार रोहनकर, मुन्ना त्रिवेदी, संजय संयाम, महेश खडसे, बंटी वाघमारे, दिनेश ढोबे, अनंता गलांडे, रुपेश काटकर आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते