आदिवासींच्या अधिकाराबाबत जनजागृती कार्यक्रम*

*आदिवासींच्या अधिकाराबाबत जनजागृती कार्यक्रम*

आदिवासींच्या अधिकाराबाबत जनजागृती कार्यक्रम*
आदिवासींच्या अधिकाराबाबत जनजागृती कार्यक्रम*

*मीडिया वार्ता न्यूज*
*✍प्रतिनिधि :- राहुल भोयर ,(ब्रम्हपुरी)मो.9421815114*✍

*ब्रम्हपुरी* :- .मा. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय,मुंबई यांचे आदेशान्वये तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशान्वये तालुका विधी सेवा ब्रम्हपुरी अंतर्गत दिनांक २ ऑक्टोबर २०२१ ते १४ नोव्हेंबर २०२१ पर्यंत विधी सप्ताह राबविण्यात येत असून त्याच्याच एक भाग म्हणून दिवाणी व फौजदारी न्यायालय बम्हपुरी येथे आज दिनांक 28-10-2021विधीविषयक जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मा.न्यायाधीश एम.जी मोरे साहेब उपस्थित होते. तसेच अधिवक्ता संध उपस्थित होते. यावेळी मा.न्यायाधीश महोदयांनी आदिवासींच्या अधिकाराबाबत सखोल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी न्यायालयीन कर्मचारी सौ. एच.जी खोब्रागडे मॅडम, साबेर काझी, नरेश पेन्दोर, सचिन शेन्डे, सचिन रणदिवे, इत्यादीनी मोलाचे सहकार्य केले.तसेच यावेळी पक्षकार महिला व पुरुषांची सुधा उपस्थिती होती.