शेवटीआर्यन खानला जामीन मंजूर

45

शेवटीआर्यन खानला जामीन मंजूर

शेवटीआर्यन खानला जामीन मंजूर
शेवटीआर्यन खानला जामीन मंजूर

विशाल गांगुर्डे, बदलापूर प्रतिनिधी
मोब. नं. – 9768545422

मुंबई : क्रुझ ड्रग्स प्रकरणात तुरुंगात असलेला अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला आहे. आजच्या सुनावणीनंतर आर्यन खानला क्रुझ ड्रग्स प्रकरणात जामीन मंजूर झाला आहे. आज आर्यन खानसहित अरबाज मर्चेंट, मुनमुन धमेचा यांना जामीन मंजूर झाला आहे.

क्रुझ ड्रग्स प्रकरणात आर्यन खान तुरुंगात अडकला होता. आज मुंबई हायकोर्टाने आर्यन खान, अरबाज मर्चेंट आणि मुनमुन धमेचा यांना दिलासा देत जामीन मंजूर केला आहे. मुंबई हायकोर्टात तब्बल तीन दिवस आर्यन खानच्या जामीन देण्यावर सुनावणी सुरू होती. मात्र, आर्यन खानच्या तीन वकिलांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर त्यांना मुंबई हायकोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. हायकोर्टाच्या जामीनाचा आदेश येणे बाकी आहे, त्यामुळे आर्यन खानला आजची रात्र तुरूंगात काढावी लागणार आहे. मात्र, आर्यन खानला जामीन मंजूर झाल्याने शाहरुख खानच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.