बसविना स्‍थानक सुने; कर्मचारी उपोषणामुळे आगारात बस बंद

68

बसविना स्‍थानक सुने; कर्मचारी उपोषणामुळे आगारात बस बंद

बसविना स्‍थानक सुने; कर्मचारी उपोषणामुळे आगारात बस बंद
बसविना स्‍थानक सुने; कर्मचारी उपोषणामुळे आगारात बस बंद

आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा
हिगनाघाट २८/१०/२१ एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे बसची चाके पुन्‍हा थांबली आहेत. हिगनाघाट आगारांमधून एक देखील बस बाहेर न गेल्‍याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. आज पहाटे पाच वाजेपासून एकही गाडी न सुटल्याने बाहेरगावी जाणाऱ्या– येणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत.
एसटी महामंडळाच्‍या कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. पहिल्‍या दिवशी काही बस सुटल्‍या मात्र आज पहाटेपासून कोणतीच बस फेरी न सुटली नाही. अचानक गाड्या बंद झाल्‍याने शाळा, महाविद्यालयीन मुलांची फार मोठी गैरसोय झाली. प्रत्येक बस स्टँडवरती लोकांचे एसटी बससाठी वाट पाहताना दिसले. मात्र बस नसल्‍याने खासगी वाहनांमधून प्रवास करावा लागला.
बसस्‍थानक सुने
हिंगनाघाट बसस्थानकावर कुठलीही माहिती देण्यासाठी अधिकारी किंवा कर्मचारी उपस्थित नव्हते. चौकशी केबिनमध्ये देखील कर्मचारी नसल्यामुळे कॅबिन बंद स्थितीत आहे. शिवाय बसच नाही म्‍हटल्‍यावर बसस्‍थानक देखील सुनेसुने झाले आहे. लॉकडाउननंतर काही महिन्‍याच हे चित्र पहावयास मिळाले. ही स्थिती आणखी किती दिवस राहील याची प्रवाशांना माहिती मिळत नाहीये प्रवासी खाजगी वाहनाने किंवा रिक्षाने प्रवास करताना दिसत आहेत फक्त बाहेरगावी जाणाऱ्या गाड्या ज्या व शहरांमध्ये होत्या तेवढ्याच फक्त जाताना दिसत आहेत.