आमदार समिर कुणावार यांचे हस्ते शाखा फलकाचे उदघाटन

70

आमदार समिर कुणावार यांचे हस्ते शाखा फलकाचे उदघाटन

आमदार समिर कुणावार यांचे हस्ते शाखा फलकाचे उदघाटन
आमदार समिर कुणावार यांचे हस्ते शाखा फलकाचे उदघाटन

आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा

हिंगणघाट दि.३० ऑक्टोबर
काल दि.२९ आक्टोंबर रोजी शहरातील संत तुकडोजी वार्ड प्रभाग क्रमांक ०६ येथे भारतीय जनता पक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा तसेच भारतीय जनता महिला मोर्चाच्या वतीने संयुक्तरित्या शाखा फलकाचा उद्घाटन कार्यक्रम शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
शाखेच्या उद्घाटन कार्यक्रमावेळी बोलतांना आ. समिरभाऊ कुणावार यांनी मागील हिंगणघाट न. पा. निवडणूकीत शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी आणुन शहराचा चेहरामोहरा बदलवू, असे अभीवचन शहरातील नागरिकांना दिले होते, शहराचा विकासाचे स्वप्न पूर्णत्वास येत असल्याचे बघून आपल्याला हर्ष होत असल्याचे मनोगत त्यांनी यावेळी केले.
नगरपालिका अध्यक्ष प्रेम बसंतानी यांनी आमदार समिरभाऊ कुणावार यांच्या प्रयत्नाने पुर्ण झालेल्या विकासकामांची माहिती उपस्थितांना दिली.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार समीर कुणावार, नगराध्यक्ष प्रेम बाबू बसंतानी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पक्षाचे जिल्हा महामंत्री किशोर दिघे, भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अंकुश ठाकूर, भाजपा जिल्हा सचिव सुभाष कुंटेवार, , भाजपा तालुकाध्यक्ष आकाश भाऊ पोहाणे, संजय भाऊ डेहणे, शहर अध्यक्ष आशिष भाऊ परबत , प्रा. किरणजी वैद्य, शंकरराव मुंजेवार, रवींद्र रोहणकर, हिंगणघाट न.प.सभापती सोनु गवळी, भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्ष सोनु पांडे, भाजयुमो उपाध्यक्ष भुषण आष्टनकर, भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष सौ. अनिता ताई मावळे, नगरसेविका छायाताई सातपुते, रवीला ताई आखाडे, वंदनाताई कामडी, शारदाताई पटेल, संगीता ताई मेंढे, तसेच तुकडोजी वार्डातील कार्यकर्ता जयंतराव ढगले, शंकरराव ढगे, वामनराव टमगिरे, अशोकराव चिल्लरवार, सतीश राव धोटे, शंकरराव महाजन, नरेशराव पेंडे, दिलीप राव बोभाटे, वसंतराव भोंबले, शाखा अध्यक्ष दिलीपराव धोटे, अर्चनाताई एटीवार , प्रज्योत रेडलावार, इत्यादी कार्यकर्ते तसेच भाजपा व युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सदर कार्यक्रमाला उपस्थित होते.