कोरपना तालुक्यात अवैद्य व्यवसाय जोमात?अधिकाऱ्याच्या
नावावर स्वस्त धान्य दुकान संघटनेच्या पदाधिकार्या काढून वसुली

नावावर स्वस्त धान्य दुकान संघटनेच्या पदाधिकार्या काढून वसुली
✍संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800
कोरपना,सविस्तर वृत्त खलील प्रमाणे आहे की कोरपना तालुक्यात
अधिकाऱ्यांच्या नावावर. स्व धा दुकान संघटनेच्या पदाधिकाऱ्या कडून वसुली ?तालुका दक्षता समित्या नावापुरते ,, शासनाच्या वतीने कोरपना तालुक्यातील ग्रामीण व दुर्गम भागांमध्ये 97 धान्य वितरण केंद्राद्वारे शिधापत्रिका धारकांना वितरण केंद्रापर्यंत शासनाच्या वतीने गहू तांदूळ साखर वितरण केल्या जाते हजारो कार्डधारकांना कोरपना येथील शासकीय गोदामातून दरमहा अंत्योदय लाभार्थी प्राधान्य कुटुंब कुटुंबांना तांदूळ प्रति किलो तीन रुपये गहू प्रति किलो दोन रुपये अंतोदय लाभार्थींना एका कार्डवर 35 किलो धान्य तसेच इतर कुटुंबांना प्रति युनिट पाच किलो धान्य स्वस्त दरात देण्यासाठी शासनाने सुविधा उपलब्ध केली आहे पंतप्रधान मोफत धान्य योजनेअंतर्गत प्रति व्यक्ती पाच किलो धान्य मे महिन्यापासून नोव्हेंबर पर्यंत देण्याचे शासनाचे धोरण असून लोकांना मोफत धान्य वाटप करिता शासनाच्या वतीने स्वस्त धान्य दुकानदारांना प्रति क्विंटल 150 रुपये कमिशन दिल्या जाते तसेच दरमहा नियमित धान्य वितरण करिता रूपये.150 प्रति क्विंटल देखील दिल्या जात असताना महिन्याकाठी शासनाकडून 1000 क्विंटल पेक्षा अधिक धान्य शिधापत्रिका धारकांना पुरविला जाते कोरपना तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार संघटना यांनी नवीन फंडा सुरू करुण २०२०मध्येगतवर्षी मोफत धान्य वाटप लाखो रुपये अधिकाऱ्याच्या नावाने गोळा केले ते असंतोष दुकानदारात खदखदत असताना शासनाकडून आलेले कमिशन वाटपासाठी म्हणून दुकानदाराची विशेष सभा घेऊन पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना दिवाळी भेट देण्यासाठी कोरपना तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदाराकडून पाच ते दहा हजार रुपये किंवा पहिल्या मे महिन्याच्या मोफत धान्य वितरण कमिशन रकमेचे पन्नास टक्के रक्कम जमा करा अन्यथा तुमचे कमिशन चे पैसे लवकर मिळणार नाही असा दम भरला नक्की वसूल केलेली रक्कम ही अधिकाऱ्याच्या खिशात जाणार की? अधिकाऱ्याच्या नावावर गोरख धंदा चालविल्या जात असल्याने अनेक दुकानदारांनी नाराजी व्यक्त केली आहे यापूर्वी महाराष्ट्र विधिमंडळाचे अंदाज समिती या भागात दौरा करणार आहे म्हणून प्रति दुकान पाचशे ते हजार रुपये वसूल केल्याने दुकानदारा मध्ये मोठी नाराजी चे सूर उमटत आहे कोरपना तालुक्यामध्ये राजकीय वरदहस्त व अधिकार्याचा वाचक संपुष्टात आला की काय असे चित्र निर्माण झाले असून पोलीस व महसूल विभागाच्या भूमिकेबद्दल जनमानसामध्ये अनेक चर्चा उघड उघड चालले आहे नुकत्याच महसूल विभागाच्या एका लिपिकास अटक झाली असे असताना भ्रष्टाचार व वाढता गैरव्यवहार यामुळे जन सामान्य नागरिक आंदोलनाचा शस्त्र उगारणार असे चित्र निर्माण होत आहे अनेक तक्रारी वरिष्ठ कार्यालयाला होऊनसुद्धा प्रशासनाकडून दखल घेतल्या जात नसल्याने मागील दोऱ्यात पालकमत्र्यांची घोषणा . हवे विरली त्याचा परिणाम दोन दिवस दिसुन आला अनेक गावांमध्ये अवैध दारू जुगार सट्टापट्टी त्याचबरोबर ऑनलाईन जुगाराचा व्यवसाय सुंगधीत तबांकु खुलेआम सुरू आहे सट्टापट्टी वर अनेक तरुण आहारी जाऊन शेतीच्या कामावर देखील परिणाम झाला आहे या सर्व व्यवहारावर आळा घालणार कोण असा प्रश्न नागरिकाकडून विचारला जात आहे कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचा राक्षस प्रशासनिक कामात उतरल्याने जनसामान्य नागरिकांच्या अनेक समस्या रेगांळल्याने कामे होत नाही अनेक चक्राकाटुन ही वेळेवर काम होत नसल्याने नागरिकांची सनद ही निव्वळ कार्यालयीन बोर्डा पुरती मर्यादित आहे की काय असा प्रश्न निर्माण होतो वाढत्या अवैध व्यवसाय यामुळे राजकीय नेत्यांच्या बघ्याची भूमिका यावरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे या व्यवसायाला आर्शीवाद कोनाचाकोरपना तालुक्यातील भोंगळ कारभाराला शासन आवर घालेल काय असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहे प्रथमच दुष्काळ अतिवृष्टी अशा संकटामध्ये शेतकरी व नागरिक कोरोना काळातील व्यवसायावर झालेला परिणाम अनेक नागरिक चितींत असताना मात्र प्रशासनिक अधिकाऱ्याच्या नावावर सुरु असलेला गोरखधंदा उघड पाडाल का अशी चर्चा सुरू आहे बघुया दिवाळीच्या फटाक्या सोबत अवैध व्यववासीकाचे फटाके प्रशासन कडून फुटणार की फुसकी बॉम्ब ठरणार ते