हिंगणघाट मधिल जनतेची आर्थिक लूट करण्याऱ्या महावितरण अभीयंत्यावर कारवाई करा!

55

हिंगणघाट मधिल जनतेची आर्थिक लूट करण्याऱ्या महावितरण अभीयंत्यावर कारवाई करा!

हिंगणघाट मधील जनते मागणी

प्रत्येक विज ग्राहकाला महिण्याकाठी लावत आहे 562 रुपयांचा वाढीव चुना

हिंगणघाट :- देशातली सर्वसामान्य जनता करोनाने पिचली आहे. करोनामुळे शेतकरी , कामगार , व्यावसायिक , मजूर यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. त्यात वाढीव बिल देऊन वीज मंडळाने जखमेवर मीठ चोळलय. वाढीव वीज बिल देऊन ग्राहकांच्या नरड्यावर पाय देण्याचे कामच वीज कंपन्यांनी केलं. आज जनतेला आधार देण्याची गरज असताना वीज बिलांच्या रूपाने जनतेची लूट करण्याची शर्यत सुरू आहे की काय? असा प्रश्न सर्वसमान्य जनतेला पडतो आहे.

हिंगणघाट येथील महाराष्ट्र राज्य विद्यूत वितरण कंपनीच्या अभियंत्याच्या मनमानी कारभाराने अनेक परीवाराना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
स्थानिक हिंगणघाट येथील विज महावितरण कंपनीत अभियंता हे गोर गरीब जनतेला नाहक त्रास देण्याचे काम करत आहे. विद्युत बिलाच्या नावाखाली जनतेची आर्थिक लूट करत आहे. प्रत्येक विज ग्राहकाला अधिभाराच्या नावावर 562 रुपये वाढीव विज बिल पाठवुन जनसामान्यांची आर्थिक लूट करून दिवसा ढवळ्या महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी आर्थिक भ्रष्टाचार करत आहे. विज वितरण कर्मचा-यांना याबाबत विचारणा केल्यास ते उडवाउडवीची उत्तरे देतात,” उद्धटपणे सामान्य जनतेशी वागत आहे. या भ्रष्ट कर्मचाऱ्यामूळे जनता त्रस्त झाली आहे. आशा भ्रष्ट व आपल्या कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करावी, व त्याला निलंबित करावे. अशी मागणी हिंगणघाट मधिल जनता करत आहे.