*प्रेमप्रकरणातून वाढलेल्या हत्येच्या घटना पोलीसांसमोर नवं आव्हान घेऊन आली*

त्रिशा राऊत
चिमूर तालुका प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mo 9096817953
नागपूर : – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की ,नागपूरात प्रेमप्रकरणातून वाढलेल्या हत्येच्या घटना पोलीसांसमोर नवं आव्हान घेऊन आलं आहे.
नागपूरात अवघ्या दहा महिन्यांत प्रेम मिळवण्यासाठी म्हणा अथवा प्रेमाच्या विरोधासाठी, तब्बल १६ जणांची हत्या करण्यात आली आहे.नागपुरात यावर्षी २१ ऑक्टोबरपर्यंत खुनाच्या ७९ घटना घडल्या आहेत. यात सर्वाधिक २१ हत्या क्षुल्लक कारणावरून घडल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यापाठोपाठ लव्हस्टोरीचा क्रमांक येतो. लव्हस्टोरीतून १६ जणांची हत्या करण्यात आली आहे.क्षुल्लक कारणासह प्रेमसंबंध, चारित्र्यावर संशय, अनैतिक संबंध आणि कौटुंबिक कलहातून १६ खुनाच्या घटनांची नोंद पोलीस स्टेशनमध्ये झाली आहे. प्रेमप्रकरणातून होणाऱ्या हत्या कमी व्हाव्यात, म्हणुन नागपूर पोलीस उपाययोजना राबवत आहेत.