मिशन वात्सल्य अंतर्गत साहित्य वितरण, कोवीडमुळे अनाथ झालेल्याच्या पाठीशी शासन उभे.

42

मिशन वात्सल्य अंतर्गत साहित्य वितरण, कोवीडमुळे अनाथ झालेल्याच्या पाठीशी शासन उभे.

मिशन वात्सल्य अंतर्गत साहित्य वितरण, कोवीडमुळे अनाथ झालेल्याच्या पाठीशी शासन उभे.
मिशन वात्सल्य अंतर्गत साहित्य वितरण, कोवीडमुळे अनाथ झालेल्याच्या पाठीशी शासन उभे.

युवराज मेश्राम ✒
नागपूर जिल्हा प्रतिनिधी
📲 95275 26914

कळमेश्वर:- येथील कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत झालेल्या कार्यक्रमात कोविडमुळे अनाथ
झालेल्या निधनामुळे बालकांच्या व कुटुंबातील कर्त्या पुरुषांचे निधन होऊन होऊन विधवा झालेल्या महिला भगिनींच्या पाठीशी महाविकास आघाडी शासन खंबीरपणे उभे आहेत अशा आपदग्रस्ताचे नुकसान वेदना दूर करण्यासाठी मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत त्यांना शासनाच्या विविध योजनेचा प्राधान्याने लाभ मिळवून द्यावा. अशा सूचना पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या.

कळमेश्वर व सावनेर तालुक्यातील मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना त्यांच्या हस्ते दिवाळी निमित्य विविध साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र डोंगरे, जिल्हा परिषद सदस्य देवानंद कोहळे, माजी पंचायत समिती सभापती श्रावण दादा भिंगारे, पंचायत समिती उपसभापती जयश्री वाडके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष बाबाराव पाटील, बाबाराव कोडे, नरेश गोतमारे, प्रदीप चणकापुरे, अरविंद रामावत, अशोक भागवत, नगराध्यक्ष शोभाताई कौटकर, जोशनाताई मंडपे उपाध्यक्ष नगर परिषद कळमेश्वर, नरेंद्र पालटकर, वासुदेव निंबाळकर, संजय ठाकरे, विजय ठाकरे, ज्ञानेश्वर काळे, प्रशांत निंबाळकर, प्रभाकर रानडे, उपविभागीय अधिकारी अतुल मेहत्रे, तहसीलदार सचिन यादव, यांच्यासह ग्रामस्थ महिला मंडळ यावेळी उपस्थित होते.

यावेळी पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार म्हणाले की, कोविड-19 संसर्गजन्य आजारामुळे यांचे निधन होऊन अनाथ झालेल्या बालकांना व कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे निधन होऊन एकलविधवा झालेल्या महिलांना शासकीय योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तसेच आवश्यक प्रमाणपत्राची पूर्तता करून त्यांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी शासन आपल्या दारी या संकल्पनेवर आधारित मिशन वासल्य योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील अनाथ बालकाची सुरळीत संगोपन होण्यासाठी या यांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

कोविड-19 मुळे विधवा झालेल्या महिलांना भगिनींना संजय गांधी निराधार योजनेचे इतर शासकीय योजनेचा लाभ मिळवून दिला जात आहे कोविड-19 मुळे गमावलेल्या बालकांना व कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे निधन होऊन शासनातर्फे योग्य ती मदत करण्यात येईल असे उद्गार पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी केले. या कार्यक्रमाला तालुक्यातील बहुसंख्य महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.