अतिरुष्टिमुळे व अवकाळी पाऊसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई तथा कर्ज माफी धारक शेतकऱ्यांना कर्ज माफिचा लाभ द्यावा — राजुरा भाजपाची मागणी* *मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे यांना तहसीलदार राजुरा मार्फत दिले निवेदन*

46

*अतिरुष्टिमुळे व अवकाळी पाऊसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई तथा कर्ज माफी धारक शेतकऱ्यांना कर्ज माफिचा लाभ द्यावा — राजुरा भाजपाची मागणी*

*मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे यांना तहसीलदार राजुरा मार्फत दिले निवेदन*

अतिरुष्टिमुळे व अवकाळी पाऊसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई तथा कर्ज माफी धारक शेतकऱ्यांना कर्ज माफिचा लाभ द्यावा -- राजुरा भाजपाची मागणी* *मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे यांना तहसीलदार राजुरा मार्फत दिले निवेदन*
अतिरुष्टिमुळे व अवकाळी पाऊसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई तथा कर्ज माफी धारक शेतकऱ्यांना कर्ज माफिचा लाभ द्यावा — राजुरा भाजपाची मागणी*
*मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे यांना तहसीलदार राजुरा मार्फत दिले निवेदन*

खुशाल सूर्यवंशी
राजुरा शहर ग्रामीण
प्रतीनीधी
8378848427

चंद्रपूर जिल्ह्यातील तथा राजुरा विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांना अजूनही अतिरुष्टिमुळे व अवकाळी पाऊसामुळे झालेल्या नुकसानीचा नुकसान भरपाई ची रक्कम मिळालेली नसून उपरोक्त शेतकऱ्यांच्या शेतजमिनीची मौका चौकशी पाहणी सुध्दा झालेली नाही.अद्यापही पंचनामे तयार करण्यात आले नाही.
जिल्हाधिकारी तथा तहसील स्थळावर या संदर्भात सुचना देऊन अनेक दिवस झाले पण कोणत्याही तलाठी तथा ईतर अधिकारी यांनी पहाणी करण्यात आली नाही.फक्त राज्य सरकार च्या वतीने आश्वासन देण्यात आले,नुकसानभरपाई देण्यात यावी यामागणी करिता माजी आमदार अँड.संजय धोटे व माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या नेतृत्वाखाली मा.मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना तहसीलदार राजुरा मार्फत निवेदन देण्यात आले

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश यांच्या सूचनेनुसार तथा भाजपा चंद्रपूर यांचा मार्गदर्शन खाली,राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अँड संजय धोटे व माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या नेतृत्वाखाली मा.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना तहसीलदार राजुरा मार्फत निवेदन देण्यात आले,

समस्त ग्रामीण भागातील शेतकरी बाधव आस ठेवत आपले आयुष्य काढत आहे.मध्यतरी राज्य सरकारने कर्ज माफी ची घोषणाबाजी केली पंरतु ती सुध्दा रक्कम अल्पशा काही शेतकऱ्यांना मिळाली त्यानंतर त्याचे सुध्दा स्वरूप माहिती झाले नाही ति पण रक्कम मिळालेली नाही. पुनरगटन चे कारण समोर करून राज्य सरकार शेतकऱ्यांना तोडाला पाणी सोडत आहेत. ज्या शेतकऱ्यांनी नियमितपणे कर्ज भरले त्याना प्रोत्साहन पर भत्ता स्वरूप रक्कम देण्याचे शासनाने जाहीर केले ती पण रक्कम आजपर्यंत मिळालेली नाही.महाविकास आघाडी सरकारने नुकसानभरपाई चा शासन निर्णय काढला त्यात पुर्व विदर्भातील नागपूर व गडचिरोली जिल्हाचा समावेश केला पंरतु चंद्रपूर जिल्हाला यामधून वगळले आहे.शेतकरी बांधव आर्थिक संकटात असुन पिकाना योग्य रित्या बाजार भाव सुध्दा मिळत नसल्यामुळे जगणे मरणे कठीण झाले आहे.या सर्व मागण्याची राज्य सरकारने त्वरित दखल घ्यावी,यावेळी भाजपचे वतीने निदर्शने करण्यात आले,तसेच शिष्टमंडळाद्वारे निवेदन देवून मागणी करण्यात आली.

याप्रसंगी राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अँड.संजय धोटे,माजी आमदार सुदर्शन निमकर, जिल्हा परिषद सभापती सुनिल उरकुडे यांच्यासह भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश धोटे,जिल्हा सचिव वाघूजी गेडाम,भाजपा तालुका महामंत्री दिलीप वांढरे,संजय उपगनलावार,तालुका महामंत्री प्रशांत घरोटे,नगर सेवक राजेंद्र डोहे,पंचायत समिती सदस्य कुमारी नैना परचाके,भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे,ओबीसी आघाडी जिल्हा महामंत्री संदीप पारखी,भाजयुमो तालुका अध्यक्ष सचिन शेंडे,भाजयुमो तालुका महामंत्री रवि बुरडकर,भाजपचे नेते महादेव तपासे,सरपंच चुनाळा बाळनाथ वडस्कर,सरपंच पौवणी पांडुरंग पोटे,सुनिल लेखराजनी,विलास खिरटकर,जनार्धन निकोडे,ग्रामपंचायत सदस्य दिपक झाडे,ग्रामपंचायत सदस्य रवींद्र गायकवाड,श्रीनिवास पांजा,संदीप गायकवाड,अनिल खणके,कैलास कार्लेकर,महेश रेंगुंडवार,लखन जाधव,पराग दातरकर,प्रकाश आस्वले,सुरेश कुंभे,भाऊराव कुंभे
आदी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.