*दुचाकीस्वाराची बैलगाडीला मागून जोरदार धडक*
*दुचाकीस्वार गंभीर जखमी*
*गोंडपिपरी तालुक्यातील घटना*

*दुचाकीस्वार गंभीर जखमी*
*गोंडपिपरी तालुक्यातील घटना*
राजेंद्र झाडे
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपिपरी:- गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी-विठ्ठलवाडा मार्गावर दुचाकीस्वाराने बैलगाडीला मागून जोरदार धडक दिल्याने चेक विठ्ठलवाडा येथील दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत. जखमी युवकाचे नाव करण सुधाकर झाडे वय 20 वर्ष व आकाश किसन दुर्गे वय 18 वर्ष असे आहे.
सविस्तर वृत्त असे की, दि.2 नोव्हेंबरला दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी चेक विठ्ठलवाडा वरुन विठ्ठलवाडा येथे रात्रौ सात वाजताच्या सुमारास येत होते. दिवसभर शेतात काम करून शेतातून घरी परतणाऱ्या एका शेतकऱ्याच्या बैलगाडीला मागून दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिली यात दुचाकी स्वार गंभीर जखमी झाले .
घटनेची माहिती गोंडपिपरी पोलिसांना देण्यात आली असता गोंडपिपरी पोलीस स्टेशनचे पोलिस कर्मचारी घटनास्थळी हजर झाले तत्पूर्वीच उपस्थितांनी जखमींना उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय गोंडपिपरी येथे दाखल केले. जखमींना जबर मार असल्याने डॉक्टरानी त्यांना चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयात रेफर दिले आहे. जखमीपैकी एका ची प्रकृती चिंताजनक असल्याचे माहिती झाली आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.