लग्नाचा पहिल्या दिवशीच नवविवाहित महिला आपल्या प्रेमीकेबरोबर पळाली; पतीला आला हार्ट अटॅक.

✒मिडिया वार्ता न्युज ब्युरो✒
केरळ:- केरळ राज्यातील त्रिशूर जिल्ह्यामधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. त्रिशूर जिल्हातील चेरपू येथील पाझूवील गावात लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी एक 23 वर्षीय नव विवाहित महिला बेपत्ता झाली होती. त्यामूळे सर्वीकडे एकच खळबळ उडाली होती. ती बेपत्ता झालेली विवाहित महिला मदुराई जिल्ह्यामध्ये सापडली आहे. खळबळजनक बाब म्हणजे ही विवाहित महिला स्वताःच्या इच्छेने तिच्या प्रेमीके बरोबर पळून गेली होती. समलैंगिक संबंधांच हे प्रकरण पाहून पोलीस थोड्या वेळेसाठी चक्रावले होते.
एक दिवसा अगोदरच तिच्यासोबत लग्नबंधनात अडकलेल्या नवऱ्याला पत्नी बेपत्ता झाल्याचं समजताच हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्याच्यावर अँजिओप्लॅस्टी करावी लागली.
एकीकडे नवरा मुलगा रुग्णालयात जीवन मरणाची लढाई लढत असतानाच दुसरीकडे पोलीस आणि या दोघांचेही नातेवाईक या तरुणीचा शोध घेत होते. अखेर बराच शोध घेतल्यानंतर मदुराईमधील एका लॉजमध्ये हि नवविवाहीता तिच्या प्रेमीके बरोबर राहत असल्याची माहिती समोर आली. दरम्यान या तरुणीच्या पतीवरील शस्त्रक्रीया यशस्वी ठरली असून त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे.
याहून अधिक थक्क करणारी गोष्ट म्हणजे या तरुणीला आधीपासूनच तिच्या प्रेयसीसोबत राहण्याची इच्छा होती. मात्र लग्नामध्ये माहेरच्यांकडून मोठ्याप्रमाणात सोनं मिळेल हे ठाऊक असल्याने तिने लग्न केल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. 24 ऑक्टोबर रोजी या मुलीचं त्रिशूरमधील चावाकड येथे राहणाऱ्या तरुणासोबत लग्न झालं. मात्र लगेच 25 ऑक्टोबर रोजी या तरुणाने लग्न करुन घरी आणलेली पत्नी दुसऱ्याच दिवशी बेपत्ता झाल्याची तक्रार स्थानिक पोलीस स्थानकात नोंदवली.
नव विवाहिता बँकेतून पळून गेली…
लग्नाच्या दुसऱ्या दिवशी चेरपूर येथील एका बँकेत हे दोघे काही कामानिमित्त गेले होते. बँकेमध्ये नवरा काही कामानिमित्त थांबला असताना या तरुणीने त्याच्याकडून त्याच्या मोबाईल मागून घेतला. आपण आपल्या एका मैत्रिणीला भेटून काही वेळात आलोच असं सांगून ही तरुणी दुचाकीवरुन नवऱ्याचा मोबाईल घेऊन निघून गेली पण ती परतलीच नाही.
ट्रेनचं तिकीट केल बुक अन् बसने प्रवास..
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा नवरा बँकेजवळ त्याच्या पत्नीची सायंकाळी पाच वाजेपर्यंत वाट पाहत होता. अखेर त्याने सायंकाळी पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली. तपासामध्ये या तरुणीने तिच्या प्रेयसीसोबत चेन्नईला पळून जाण्यासाठी त्याच दिवशी त्रिशूर ते चेन्नई तिकीट बूक केल्याची माहिती समोर आली. मात्र चेन्नईला जाण्याऐवजी या दोघी बसने कोट्टयमला गेल्या. नंतर दुसऱ्या दिवशी या दोघी ट्रेनने चेन्नईला गेल्या. त्यानंतर त्या चेन्नईवरुन मदुराईला गेल्या जिथे त्या एका लॉजमध्ये थांबल्या होत्या.