टेकडा जाफराबाद परीसर कव्हरेज क्षेत्राचा बाहेर*

55

*टेकडा जाफराबाद परीसर कव्हरेज क्षेत्राचा बाहेर*

टेकडा जाफराबाद परीसर कव्हरेज क्षेत्राचा बाहेर*
टेकडा जाफराबाद परीसर कव्हरेज क्षेत्राचा बाहेर*

रवि एस. बारसागाडी़ ✒
9010477883
सिरोंचा तालुका प्रतिनिधी

*गडचिरोली :* सिरोंच तालुक्यातील भौगोलिक व लोकसंख्या दृष्टी ने मोठे असलेल्या गाव टेकडाताल्ला आहे ह्या परिसरात अद्यापही मोबाईल टॉवर उभारल्या नसल्याने या परिसरातील नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे..

सिरोंचा तालुक्यातील टेकडाताल्ला परिसरातील मोबाईल टॉवर च अभावाने या भागातील लोकांना शेजारील तेलंगाणा राज्याच्या नेटवर्क वर अवलंबून राहावे लागत आहेत. त्यामुळे टेकडाताल्ला येते बीएसएनएल किंवा खासगी मोबाईल टॉवर च्या फोर जी सेवेच्या लाभ देण्यात यावा अशी मागणी मोबाईल धरकाकडून वारंवार केली जात आसून शासनाकडून कोणतीच प्रतिक्रिया दिसत नसल्याने मोबाइल वापरकर्त्यानी संताप व्यक्त करत आहे..

शेजारच्या तेलंगणा मध्ये असलेले मोबाईल टॉवर कोसो लांभ आहेत त्यामुळे टेकडाताल्ला परिसरात कव्हरेज मिळत नाही. कव्हरेज मिळाली तरी एक किंवा दोन पाईंट पकडते व कमी दर्जाचा कव्हरेज मुळे फोन लागत नाही आणि इंटरनेट तर कुचकामी ठरत आहे.

एकीकडे शासनाकडून विविध योजना इंटरनेट चा माध्यमाद्वारे प्रसिद्ध होत असून या भागातील जनतेला मात्र वेळेवर माहिती मिळत नाही याची फटकाही सहन करावा लागत आहे..
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शाळा महाविद्यालय आदी ऑनलाईन पद्धतीने क्लासेस घेत आहेत मात्र परिसरात एक ही मोबाईल टॉवर नसल्याने विद्यार्थांचे शैकषणिकदृष्ट्या नुकसान होते आहे, याकडे विशेष लक्ष देण्याचे गरज आहे

परिणामी या भागातील पाच ते सहा गावामध्ये मोबाईल कव्हरेज व इंटरनेट ची समस्या अत्यंत गंभीर आहे.

एवढेच नव्हेतर या भागातील असलेले टेकडाताल्ला, जाफराबाद , मोकेला , नेमडा, पुसुकपल्ली , बोरमपल्ली आदी गावातील हजारो मोबाईल वापरकर्ते तेलंगणाचा नेटवर्कर अवलंबून आहेत. कव्हरेज अभावाने ते बिनकामाचे ठरत आहे. परिसरातील अनेक नागरिकांकडे बीएसएनएल जीओ चा सिमकार्ड आहेत. आजकाल मोबाइल व इंटरनेट आवश्यक बनली आहे. यामुळे फोर जी सेवा देण्याची मागणी वारंवार केली जात आहे..