नाशिक पोलीस संत एकनाथ हौऊन गाढवाला पाजल पाणी. सर्वीकडे होत आहे कौतूक.

41

नाशिक पोलीस संत एकनाथ हौऊन गाढवाला पाजल पाणी. सर्वीकडे होत आहे कौतूक.

नाशिक पोलीस संत एकनाथ हौऊन गाढवाला पाजल पाणी. सर्वीकडे होत आहे कौतूक.
नाशिक पोलीस संत एकनाथ हौऊन गाढवाला पाजल पाणी. सर्वीकडे होत आहे कौतूक.

मीडिया वार्ता न्यूज✒

नाशिक:- नाशिक जिल्हातील चांदोरी येथील सायखेडा येथे माणुसकी जपनारी एक घटना समोर आली आहे. दिवाळीमुळे नागरिकांची सायखेडा या गावात खरेदीसाठी गर्दी असतांना भर रस्त्यावर पाण्यासाठी व्याकूळ झालेल्या गाढवास सायखेडा पोलिसांमधील सहाय्यक पोलिस निरीक्षक पी. आय. कादरी यांनी पाणी पाजत तृष्णातृप्ती केल्याने संत एकनाथांच्या आधुनिक भूमिकेत सायखेडा पोलिस असल्याचे अनेकांनी बघितले. पोलिसांनाही भूतदया असल्याची प्रचिती आल्याने उपस्थितांनी कौतुक केले.

सायखेडा शहरातील वर्दळीच्या पोलिस स्टेशन परिसरात रस्त्याच्या कडेला भर दुपारी उन्हात दोन गाढव निपचित पडल्याचे सहायक पोलिस निरीक्षक पी. वाय. कादरी यांना दिसले. त्यांनी त्यास तेथून हुसकावून लावण्याचे प्रयत्न केले. मात्र तृष्णेने व्याकूळ झालेल्या त्या दोन गाढवाने कुठलीही दाद न दिल्याने तेथे उपस्थित असलेल्या कादरी यांनी पोलिस हवालदार तेलोरे, किरण नाईक, नवनाथ नायकवाडी या पोलिस कर्मचाऱ्यांची भूतदया जागृत झाली. बाजूलाच असलेल्या पोलिस स्टेशनमधून पाणी व थोडी खाद्यसामग्री मागवण्यात आली. पोलिस कर्मचाऱ्यांनी पाणी देताच बराच वेळपासून निपचित पडलेल्या गाढवानी त्वरित पाणी पिऊन आपली तृष्णातृप्ती केली. यामुळे तीव्र उन्हाने गलितगात्र झालेल्या गाढवास ऊर्जा आली आणि काय तर ते उठून बसले. रस्त्याने जाणाऱ्या अनेकांनी हा काय प्रकार आहे, याकरिता थांबून बघितले. गाढवास पाणी देणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांचे उपस्थितांनी कौतुक करीत इतिहासातील संत एकनाथांनी त्या काळी गाढवास पाणी दिल्याची घटना अनेकांनी बोलून दाखवीत सायखेडा पोलिस आधुनिक एकनाथ असल्याची पावती दिली.