जिल्ह्यातील एसटी कर्मचारी पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत

✒आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा
वर्धा ०७/११/२१
राज्य परिवहन महामंडळाते राज्य सरकारमध्ये विलगिकरण व्हावे या मागणीसाठी जिल्ह्यातील एसटी कर्मचारी पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. कर्मचाऱ्यांनी मध्यरात्री पासून १०० टक्के काम बंद आंदोलन सुरु केल्याने आज (रविवार) सकाळपासून एक ही बस बाहेर पडली नाही. सणा सुदीच्या दिवसात एसटीची चाके थांबल्याने प्रवाशांचा खाेळंबा झाला आहे. दरम्यान जिल्ह्यात देखील मध्यरात्रीपासून एसटी कर्मचा-यांनी काम बंद आंदाेलन सुरु केल्याने प्रवासी संतापले आहेत.
एसटी महामंडळाच्या वाहक, चालक आणि यांत्रिकी कर्मचांऱ्यानी बैठक बोलवत विना नेता विना संघटना या संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. अध्यक्ष आणि सचिवांनी संघटनांच्या पदाचा राजीनामा देत हा संप पुकारला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आगारातून आज (रविवार) सकाळपासून एक ही बस बाहेर न पडल्याने भाऊबीज या सणा निमित्त बाहेर पडलेल्या प्रवाशांची मोठी गैरसोय निर्माण झाली. जो पर्यंत शासन निर्णय घेत नाही तो पर्यंत संप सुरच ठेवण्याचा निर्णय कर्मचांऱ्यानी घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यात एसटीची चाके थांबली आहे.