चंद्रपुर: महिलेच्या पोटातून काढला तब्बल 16 किलोचा मांसाचा गोळा.

61

चंद्रपुर: महिलेच्या पोटातून काढला तब्बल 16 किलोचा मांसाचा गोळा.

चंद्रपूरमधील मानवटकर रुग्णालयातील डॉक्टरांनी अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करून एका महिलेचा जीव वाचवण्यात यशस्वी.

चंद्रपुर: महिलेच्या पोटातून काढला तब्बल 16 किलोचा मांसाचा गोळा
चंद्रपुर: महिलेच्या पोटातून काढला तब्बल 16 किलोचा मांसाचा गोळा

जिजा गुरले✍
चंद्रपूर ग्रामीण प्रतिनिधी
9529811809
चंद्रपूर:- सात वर्षांपासून पोटात १५ किलो ९०० ग्रॅम वजनाचा मांसाचा गोळा घेऊन दिवस पुढे ढकलणाऱ्या एका महिलेवर चंद्रपूरमधील डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून तिला जीवनदान दिलं आहे. शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाला पाच बाटल्या रक्त द्यावं लागलं. सध्या तिची प्रकृती उत्तम असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

चंद्रपूरमध्ये किचकट शस्त्रक्रिया यशस्वी
एका महिला रुग्णाचे पोट वाढत होते. पण काही त्रास नसल्यामुळं कुटुंबीयांनी त्याकडं विशेष लक्ष दिलं नाही. तिचे पती पोलीस विभागातून निवृत्त झाले होते. मुले नोकरीवर. मात्र, तिला दवाखान्याबद्दल प्रचंड भीती वाटायची. त्यामुळं दवाखान्यात कसं न्यावं, हा प्रश्न कुटुंबाला छळत होता. मात्र, एक दिवस अचानक पोटात दुखायला लागल्यामुळं ती बेचैन झाली. रविवारचा दिवस होता. मानवटकर हॉस्पिटलमध्ये मोफत शिबिर सुरू होते. कुटुंबानं अखेर या महिलेला मानवटकर हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. त्यांची नाजूक प्रकृती पाहून डॉक्टरांनी सुरुवातीला उपचार करण्यास नकार दिला. सोनोग्राफी व सीटी स्कॅन केला. इतर रुग्णालयातून नकार मिळाल्यानं तुमच्याकडं आलो, असं कुटुंबीयांनी सांगताच त्यांना तत्काळ अतिदक्षता विभागात भरती करण्यात आलं.

मानेत टाकली सेंट्रल लाइन
महिला रुग्ण बेचैन असल्यानं सलाइन काढून फेकत होती. त्यामुळं डॉक्टरांनी मानेत सलाइन टाकली व तिचा रक्तदाब नियंत्रणात आणला. रक्त देऊन दुसऱ्या दिवशी सकाळी शस्त्रक्रिया सुरू केली. तब्बल अडीच तासांच्या किचकट शस्त्रक्रियेनंतर मांसाचा गोळा काढण्यात डॉक्टरांना यश आलं. त्याचं वजन १५ किलो ९०० ग्रॅम भरलं.

अंडकोषात मांसाचा गोळा ही दुर्मिळ बाब!

मांसाचा गोळा अंडकोषापासून तयार झाला होता. पीळ भरल्यामुळे अतिशय वेदना होत होत्या. इतक्या मोठ्या गोळ्याला पीळ भरणं आणि अंडकोषात मांसाचा गोळा होण ही दुर्मिळ बाब आहे, अशी माहिती डॉ. माधुरी मानवटकर व डॉ. शिल्पा टिपले यांनी दिली.