एटापल्ली स्वस्त धान्य ( रास्त धान्य) दुकान परवाना रद्द करा, तालुका काँग्रेस अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य संजुभाऊ चरडुके बहुजन कल्याण मदत व पुनर्वसन मंत्री वड्डेटीवार यांना निवेदनातून मागणी

41

एटापल्ली स्वस्त धान्य ( रास्त धान्य) दुकान परवाना रद्द करा,

तालुका काँग्रेस अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य संजुभाऊ चरडुके बहुजन कल्याण मदत व पुनर्वसन मंत्री वड्डेटीवार यांना निवेदनातून मागणी

मारोती कांबळे
गडचिरोली जिल्ह्या प्रतिनिधी ग्रामीण मो.नं 9405720593

एटापल्ली,: -तालुक्यातील जांबिया येथील रास्तधान्य दुकानदाराकडून धान्याची काळाबाजारी केली जात असतांना नागरिकांनी रंगेहात पकडले होते, त्यामुळे सदर दुकानचा परवाना रद्द करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य तथा तालुका काँग्रेस अध्यक्ष संजय चरडुके व नागरिकांनी बहुजन कल्याण, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार यांना निवेदनातून केली आहे,
सदर रास्तधान्य दुकान परिमल गाइन या नावाने मंजूर आहे, संबधीत दुकानदाराने 27 पोती धान्य अफरातफर करून चोरटया बाजारात विक्री करण्यास MH-33 G-2446 क्रमांकच्या वाहनातून घेऊन जातांना नागरिकांनी रंगेहात पकडून प्रशासकीय कारवाहीसाठी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते, त्यामुळे प्रशासनाने कारवाही करून परिमल गाइन यांचे नावाचा रास्तधान्य परवाना निलंबित केला होता, त्यानंतर मात्र आठ महिन्यात कारवाही शिथिल करून परवाना कायम करण्यात आला आहे, त्यामुळे सदर रास्तधान्य दुकानदार परिमल गाइन यांच्या धान्य काळाबाजारीत वाढ झाली असून गरीब, आदिवासी नागरिकांना रास्त व मोफत धान्य मिळणे कठिन झाले असल्याचे निवेनातून म्हटले आहे, अशा मुजोर दुकानदाराच्या नावाने मंजूर रास्तधान्य परवाना रद्द करून नवीन जाहिरनाम्याने महिला बचत गटास मंजूरी देण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य संजय चरडुके, पंचायत समिती सदस्य बेबी लेकामी, सरपंच राजू नरोटी, निजान पेंदाम, किशोर हिचामी, मंगेश उसेंडी, संजय पुंगाटी, चेतन हिचामी, रैनु पुंगाटी, राजू हिचामी, कोपा हिचामी, किसन हिचामी, चंपत करमरकर,कृष्णा नैताम, अमर हिचामी, चमरू हिचामी, कोलू हिचामी व नागरिकांनी केली आहे.