कार्यकर्त्याच्या सतर्कतेने दांपत्याचा वाचले प्राण

54

*कार्यकर्त्याच्या सतर्कतेने दांपत्याचा वाचले प्राण

कार्यकर्त्याच्या सतर्कतेने दांपत्याचा वाचले प्राण
कार्यकर्त्याच्या सतर्कतेने दांपत्याचा वाचले प्राण

राहुल भोयर,ब्रह्मपुरी 9421815114

ब्रह्मपुरी : समाजात कार्य करीत असताना निस्वार्थ पणाचे कार्य असावे हे सिद्ध करून दाखवले भारतीय युवा पॅंथर संघटनेचे ब्रह्मपुरी तालुका अध्यक्ष सुभाष भाऊ नागतोडे व भारतीय युव संघटनेचे कोषाध्यक्ष गणेश भाऊ राऊत यांनी. सविस्तर वृत्त असे. राहणार भुयार तहसील भिवापूर येथील श्री.चंदू रघु भोयर व त्यांची पत्नी सौ. कीरण चंदू भोयर हे दांपत्य व त्यांची 2 वर्षाची लहान मुलगी हे भाऊबीज ओवाळणी करीता आवळगावला जात असताना
ब्रह्मपुरी शहरातील गीत सर्वे पेट्रोल पंपाजवळ एका अग्यात सायकल स्वाराने यांच्या वाहनाला ओव्हरटेक करून पोबारा केला. त्यामुळे काहीही न कळल्याने मोटरसायकल पडली त्यामुळे पती-पत्नी व मुलगी तिघेही जखमी झाले. त्यावेळी भारतीय युवा पॅंथर संघटनेचे अध्यक्ष तथा कोषाध्यक्ष तिथे उपस्थित असल्याने क्षणाचाही विलंब न करता ब्रह्मपुरी येथील डॉक्टर गेडाम यांच्याकडे उपचारासाठी दाखल केले.
सुदैवाने लगेच उपचार झाल्याने तिघांचे प्राण वाचले. यामुळे या दोघांचेही त्या जखमी दाम्पत्यांनी आभार मानले.
समाजात बरेच लोक असतात जे समाजकार्य त्यांना आवड असल्याने समाज कार्य करीत असतात मात्र निस्वार्थपणे समाज कार्य करत असल्याने आपले कार्य अधिक महान होत असतो त्यामुळे सर्वांनी कोणत्याही स्वार्थाची अपेक्षा न करता आपण मनाने समाज कार्य करीत राहावे असे यावेळी श्री सुभाष भाऊ नागतोडे व गणेश भाऊ राऊत यांनी आपली भावना प्रकट केली.