हिंगणघाट येथे वंचित बहुजन आघाडी वर्धा जिल्हा वंचित बहुजनांचा संवाद महामेळावा संपन्न.
● सर्व कार्यकर्तानी जोमाने कामाला लागा : अशोक रामटेके
● वंचित सर्व एसटी एसटी ओबीसीच्या हक्का साठी लढण्यासाठी तयार
● ओबीसीच्या आरक्षणासाठी आम्ही रस्त्यावर येऊन लढणार.

✒ प्रशांत जगताप ✒
कार्यकारी संपादक मिडिया वार्ता न्युज
हिंगणघाट,दि.13 नोव्हे:- वंचित बहुजन आघाडी वर्धा जिल्हास्तरीय वंचित बहुजनांचा संवाद महामेळावा स्थानिक हिंगणघाट येथील केजीएन मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. या वंचित बहुजनांचा संवाद महामेळावात विदर्भातील अनेक नेते उपस्थीत होते. आगामी वर्धा जिल्हात अनेक स्थिकानी पंचायत समिती, नगर परिषद आणि नगर पंचायत, ग्राम पंचायतच्या निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून मोर्चेबांधणी करण्याच्या दृष्टीने गाव तिथे शाखा निर्माण करणे, अशा अनेक विषयांवर वंचित बहुजनांचा संवाद महामेळाव्यात चर्चा करण्यात आली.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी संपुर्ण वंचित समूहाला सत्तेत वाटा मिळवून देण्यासाठी संपूर्ण बहुजनांना सोबत घेऊन वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली आणि सामान्य कार्यकर्त्याला राजकीय सत्तेमध्ये जाण्याचा मार्ग प्रशस्त करून दिला. आगामी काळात होऊ घातलेल्या नगरपरिषद, नगरपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सत्तेत वाटा मिळावा यादृष्टीने सर्वांनी कामाला लागावे. असे आव्हान वर्धा जिल्हा निरीक्षक अशोक रामटेके आयोजक यांनी आपल्या प्रास्तावीकामध्ये केले. प्रत्येक कार्यकर्ताने पक्ष वाढीसाठी सभासद नोंदणी सह गाव तिथे शाखा निर्माण करण्याच्या सूचना उद्घाटक माजी राज्य मंत्री तथा अध्यक्ष पुर्व विदर्भ डॉ. रमेश गजबे यांनी केले. पक्षाच्या ध्येय धोरणाची माहिती सामान्यांपर्यत पोहचविण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने मेहनत घ्यावी. सभासदाच्या नोंदणीवर भर देण्यात यावा. पक्षाची बांधणी मजबूत करण्याच्यासंबधीचे नियोजन, या बाबींसह कार्यकर्त्यानी जनतेच्या प्रत्येक प्रश्नाकडे वाचा फोडण्याच्या दृष्टीने पक्षाच्या वतीने आंदोलने, मोर्चे इत्यादी कार्यक्रम हाती घेण्यात यावेत असे मत वर्धा जिल्हा अध्यक्ष अजय घंगारे यांनी अध्यक्षीय भाषण करताना सांगितले यावेळी येणाऱ्या काळात पक्ष मजबुती व वाढीव संघटन वर चर्चा करण्यात आली.

वर्धा जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष शहर ध्यक्षासह विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बहुसंख्येने उपस्थित होती. प्रमुख पाहुने म्हणुन विवेक हाडके नागपुर समन्वयक, रुपचंद टोपले आर्वी समन्वयक, सिद्धार्थ डोईफोडे वर्धा जिल्हा महासचिव, दिगांबर पलटणकर वर्धा, मंगलाताई कांबळे वर्धा जिल्हा उपाध्यक्ष, प्रियदर्शनी भेले वर्धा शहर अध्यक्ष, कुणाल वासेकर उपाध्यक्ष वर्धा जिल्हा, विक्रांत भगत वर्धा जिल्हा सचिव, अजय डांगरे हिंगणघाट तालुका उपाध्यक्ष, सिद्धार्थ जामुनकर वडनेर सर्कल अध्यक्ष, जेष्ठ नेते वसंतराव जगताप, युवा नेता अनिल मून, देवचंद शिंपी, मनोज मुरार, ललित धनविज, सुहास जिवनकर, राजु फुलझले, विनोद गुडघाणे, कैलाश झोडापे, सचिन ढोले, अंबादे पुलगाव, आनंदा जनबंधु, भीमटे गुरुजी, अशोक काळे, राजु धाबर्डे, मनोहर मानवटकर, सुरेखा मेश्राम, नम्रता भोंगाडे, सुषमा वासेकर, मंदा डोंगरे, चंद्रकला लोखंडे, कविता शिंपी, राजकन्या गजभीये, मंगला डोंगरे, माला मेश्राम, हिंगणघाट तालुका अध्यक्ष अशोकराव भाले, शहर अध्यक्ष रमेश घोडे, समुद्रपूर तालुका अध्यक्ष राजू धाबर्डे, शहर अध्यक्ष क्रांतिलाल देवढे, पंकज भगत गिरड सह अनेक कार्यकर्ते उपस्थीत होते.