वर्धा जिल्हा पेट्रोल पंप हटाव कृती समितीच्या वतीने हिंगणघाट येथे आंदोलन करण्यात आले.
●पालकमंत्री सुनील केदार व देवळी पुलगावं विधानसभेचे आमदार रंजित कांबळे यांच्या प्रतिकृतीत पुतळ्याचे दहन
● पोलिसांनी कार्यकर्ताना घेतल ताब्यात.

✒ प्रशांत जगताप ✒
कार्यकारी संपादक मिडिया वार्ता न्युज
📲 9766445348 📲
हिंगणघाट:- स्थानिक शहरात वर्धा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात उभारण्यात येणा-या पेट्रोल पंप ला हटवण्यासाठी माघील अनेक महिन्या पासुन आंबेडकरी आणुयायी आंदोलन करत आहे. त्यांनी निर्माण केलेल्या पेट्रोल पंप हटाव कृती समितीच्या माध्यमातून शासनाला जागे करण्यासाठी निवेदन देन्यात आले होते. पण शासन मुग गिळून चुप असल्यामुळे आंबेडकरी अनुयायामध्ये पेट्रोल पंप बदल असंतोष निर्माण झाला आहे. अशी माहीती पेट्रोल पंप हटाव कृती समितीच्या सदस्यांनी मिडिया वार्ता न्युज ला दिली.
त्यामूळे पेट्रोल पंप हटाव कृती समितीच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक हिंगणघाट येथे काँग्रेसचे सुनील केदार वर्धा जिल्हा पालकमंत्री व देवळी पुलगावं विधानसभेचे काँग्रेसचे आमदार रंजित कांबळे यांच्या प्रतिकृतीत पुतळ्याचे दहन करून आंदोलन करण्यात आले.
शासनाला वेळोवेळी धरणे आंदोलन, साखळी उपोषण, करूनही शासनाने गांभीर्याने दखलन घेता वर्धा येथील पेट्रोल पंपचे बांधकाम जलद गतीने सुरु केले आहे. त्या निषेधार्थ शासनाचे लक्ष वेधन्याकरिता आज आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात अनिल जवादे, गोरख भगत, अनिल मून, रसपाल शेंद्रे, मनोज वासेकर, कुणाल वासेकर, विक्रांत भगत, अजय डांगरे, सुहास जिवनकर, अनुताई सोमकुवर, मंगला कांबळे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.