बुद्धाच्या पवित्र गयेत नक्षलवाद्यांचा रक्तपात, बॉम्बने घर उडवलं, 4 लोकांची हत्या करुन मृतदेह लटकवले.

✒ प्रशांत जगताप ✒
कार्य संपादक मिडिया वार्ता न्युज
📲 9766445348 📲
बिहार:- बिहार राज्यातील गौतम बुद्धाच्या पवित्र गया मध्ये रक्ताचे पाट वाहल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. त्यामुळे सर्वीकडे नक्षलवाद्यांचा विरोधात आक्रोश दिसून येत आहे.
बिहारच्या गयामध्ये शनिवारी सायंकाळी उशिरा नक्षलवाद्यांनी हल्ला केला. गयापासून 70 किमी अंतरावर असलेल्या डुमरिया पोलीस स्टेशन क्षेत्रातील मोंनबार गांवात सरयू सिंह भोक्ता याचे घर डायनामाइट लावुन ध्वस्त केल. आणी घराला आग लावली. त्यानंतर नक्षलवाद्यांनी दोन महिलांसह चार जणांची हत्या केली. हत्येनंतर चौघांचेही मृतदेह घराबाहेर लटकवून ठेवले. मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये एकाच घरातील दोन पती आणि त्यांच्या पत्नीचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी रात्री घडली. या प्रकरणाची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तूर्तास या घटनेची अधिक माहिती मिळणे बाकी आहे. परंतु सध्या हाती आलेल्या माहितीनुसार दोन महिलांसह चार जणांची हत्या करण्यात आली आहे.
यावेळी नक्षलवाद्यांनी एक घर बॉम्बने उडवले आणि मोटारसायकली पेटवल्या. याच प्रकरणावर बोलताना एसएसपी आदित्य कुमार म्हणाले, ‘निवडणुकीत आपले वर्चस्व दाखवण्यासाठी नक्षलवाद्यांनी हे भ्याड कृत्य केले आहे. ज्या ठिकाणी चकमकीत चार नक्षलवादी ठार झाले त्याच ठिकाणी ही हत्या झाली. पोलिसांनी संपूर्ण परिसरात शोधमोहीम राबवली आहे’.
मृतांमध्ये सतेंद्र सिंग, महेंद्र सिंग, मनोरमा देवी आणि सुनीता सिंग यांचा समावेश आहे. नक्षलवाद्यांनी पोस्टर्स लावून खुलासा करताना म्हटलं आहे की, देशद्रोही आणि मानवतेचा द्रोह करणाऱ्यांना फाशीशिवाय पर्याय नाही. अमरेश, सीता, शिवपूजन आणि उदय या चार साथीदारांच्या हत्येचा हा बदला आहे. अशी कारवाई यापुढेही सुरूच राहील. घटनास्थळी लावलेले पत्रक जनमुक्ती छात्रकार सेना, मध्य विभाग झारखंड, सीपीआय (माओवादी) यांच्या नावाने लावण्यात आले आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण आहे. गया मुख्यालयातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत.