विकास कामांना प्राधान्य हेच आपले ध्येय!* आ.धर्मराव बाबा आत्राम यांचे मत *अहेरी नगरीत रस्त्यांच्या कामाचे विविध ठिकाणी भूमिपूजन* *माजी जि. प.अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांचीही उपस्थिती* विकास कामांचा धडाका!*

52

*विकास कामांना प्राधान्य हेच आपले ध्येय!*
आ.धर्मराव बाबा आत्राम यांचे मत
*अहेरी नगरीत रस्त्यांच्या कामाचे विविध ठिकाणी भूमिपूजन*

*माजी जि. प.अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांचीही उपस्थिती*

विकास कामांचा धडाका!*

विकास कामांना प्राधान्य हेच आपले ध्येय!* आ.धर्मराव बाबा आत्राम यांचे मत *अहेरी नगरीत रस्त्यांच्या कामाचे विविध ठिकाणी भूमिपूजन* *माजी जि. प.अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांचीही उपस्थिती* विकास कामांचा धडाका!*
विकास कामांना प्राधान्य हेच आपले ध्येय!*
आ.धर्मराव बाबा आत्राम यांचे मत
*अहेरी नगरीत रस्त्यांच्या कामाचे विविध ठिकाणी भूमिपूजन*
*माजी जि. प.अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांचीही उपस्थिती*
विकास कामांचा धडाका!*

अमोल एन रामटेके अहेरी तालुका प्रतिनिधी,9405855335*

 

*अहेरी:*- शहराचा व गावाचा विकास व्हावे यासाठी आपण सदैव कटिबद्ध व प्रयत्नशील असून विकास कामांना प्राधान्य हेच आपले ध्येय असल्याचे ठाम मत आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी शनिवार 13 नोव्हेंबर रोजी अहेरी नगरीतील विविध रस्त्यांच्या भूमीपूजनाप्रसंगी केले.
यावेळी प्रामुख्याने माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम, नगर पंचायतीचे प्रशासक तथा सहाय्यक जिल्हाधिकारी श्रीअंकित, मुख्याधिकारी अजय साळवे, अभियंता निशाण देशमुख, माजी नगरसेवक अमोल मुक्कावार, शैलेश पटवर्धन आदी मान्यवर उपस्थित होते.
गडअहेरी येथे अंतर्गत रस्ता, कोतूर रोडवरील गल्लीत, महागाव रोडवरील पाणी टाकीसमोरील श्रीनिवास जक्कोजवार यांच्या घरापर्यंत तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते शिशु मंदिर पर्यंत, बेघर कॉलनीतील गीताताई श्रीकोंडावार ते प्रभाकर मेश्राम यांच्या घरापर्यंत रस्ता व नाली बांधकाम, दानशूर चौक ते शंकर दंडीकवार यांच्या घरापर्यंत रस्ता बांधकाम करणे आदी रस्ता व नाली बांधकामांचे भूमीपूजन आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
सर्वप्रथम आ.धर्मराव बाबा आत्राम यांनी विकास कामांचे नामफलकाचे फित कापून अनावरण केले तर माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम यांनी विधीवतपणे पूजन करून नारळ कुदळ मारले. आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी अहेरी नगरीत एकप्रकारे विकास कामांचा धडाकाच लावल्याने अहेरी नगर वासीयांनी समाधान व आनंद व्यक्त केले.
यावेळी यशवंत सावकार दोंतुलवार, श्रीनिवास विरगोनवार, श्रीकांत मद्दीवार, सुरेंद्र अलोने, बुधाजी सिडाम, मखमुर शेख, वासुदेव पेद्दीवार, स्वप्नील श्रीरामवार, सुधाकर पेद्दीवार आदी व प्रतिष्टीत नागरिक उपस्थित होते.