कळमेश्वर जेष्ठ नागरिक संघटनेच्या अध्यक्षपदी बगडे तर सचिवपदी शेंडे.

✒ युवराज मेश्राम ✒
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
📲 95275 26914 📲
कळमेश्वर,दि.14 नोव्हे:- कळमेश्वर येथील स्थानिय गजानन महाराज सभागृहात कळमेश्वर तालुका जेष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने आमसभेचे आयोजन करण्यात आले होते. या आमसभेत पुढील 3 वर्षांकरिता नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष पदी कृष्णा बगडे गुरुजी तर सचिवपदी प्रा. हरीभाऊ शेंडे यांची एकमताने निवड करण्यात आली. तर उपाध्यक्ष मनोहर राऊत, कोषाध्यक्ष मुकुंद राऊत, तर सददस्यांमध्ये ताज मोहम्मद शेख, कृष्णा शेंडे, धानेश्वर गुरांदे, दयाराम धनगरे, मेघराज नेवले, अरुण धोटे, रुखमा काळबांडे, उमादेवी गोतम, काशिनाथ चिमुरकर आदींचा समावेश करण्यात आला.
कळमेश्वर तालुक्यातील जेष्ठ नागरिकांन साठी कार्य करण्यात ही संघटना नेहमी पुढाकार घेत असते. त्यामूळे या आमसभेला तालुक्यातील 260 जेष्ठ नागरिकांचा समावेश होता. सर्व स्थरावरुन नविन पदाधिकारी यांची निवडीचे अभिनंदन होत आहे.