*सार्वजनिक कार्यक्रमात गावातील कौरवांना व पांडवाना सांभाळून नेण्याची सहानुभूती आहे.*
— उपसरपंच,बालाजी चनकापुरे
*तालुक्यातील निराधार योजनेत बसणाऱ्या प्रत्येक लाभार्थ्यास योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सातत्याने सहकार्य करणार*
— अध्यक्ष, विनोदभाऊ नागापूरे
*दरुर येथे पार पडलेल्या “संघर्ष जीवनाचा” नाटकाला नाट्य रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…..*

— उपसरपंच,बालाजी चनकापुरे
*तालुक्यातील निराधार योजनेत बसणाऱ्या प्रत्येक लाभार्थ्यास योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सातत्याने सहकार्य करणार*
— अध्यक्ष, विनोदभाऊ नागापूरे
*दरुर येथे पार पडलेल्या “संघर्ष जीवनाचा” नाटकाला नाट्य रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…..*
राजेंद्र झाडे
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपिपरी :_दिनांक १४ नोव्हेंबर;
सतत दोन वर्षे कोरोना कालावधीत ग्रामीण भागातील हिवाळा ऋतुत होणारे रसिकांचे मनोरंजन म्हणून नाट्यप्रयोगाचे कार्यक्रम ठप्प पडलेले होते.अनेक कलाकारांची कला दाखवण्याचे कौश्यल्य व रसिकांचं मनोरंजनाच जणूकाही साधनच हिरावल होत.
यातच तो दुःखमय कोरोना संकट काळ टळताच दोन वर्षानंतर प्रथमच गोंडपिपरी तालुक्यातील दरुर या गावी दरुरचे उपसरपंच बालाजी चनकापुरे यांनी समता युवक नाट्य मंडळाचे सहकार्य घेऊन संघर्ष जीवनाचा हा ३ अंकी नाट्यप्रयोग ठेवला.या नाट्यप्रयोगाला दरुर गावासह परिसरातील हजारो नाट्य रसिक प्रेक्षकांनी नाटकाचा भरभरून आनंद घेतला.
उद्घाटन प्रसंगी निराधार योजना अध्यक्ष विनोद नागापुरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले,आमदार सुभाषभाऊ धोटे,खासदार बाळूभाऊ धानोरकर, पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थकी लावून दाखवण्याचा माझा निर्धार आहे.दोन वर्षे कालावधीत आतापर्यंतच्या कारकीर्दीत भरपूर निराधार लाभार्थीची निवड करून देण्यात मी यशस्वी झालो व त्यांना निराधार योजनेचा लाभ मिळत आहे.आणि समोर सुध्दा यापेक्षाही अधिक निराधार लाभार्थ्यांना लाभ मिळालाच पाहिजे यासाठी मी सदैव तत्पर राहणार अशी ग्वाही दिली.कार्यक्रमाचा प्रास्ताविक करताना बालाजी चनकापुरे यांनी सांगितले की,गावातील सार्वजनिक कार्यक्रम म्हटल्यानंतर सर्वांचं सहकार्य असणे आवश्यक आहेच. सोबतच अश्या कार्यक्रमात कौरव व पांडव असतात याना सांभाळून नेण्याची सहानुभूती माझ्यात आहे.असे मत बालाजी चनकापुरे व्यक्त केले.
नाटकाच्या उद्घाटन प्रसंगी सरपंच संघटना अध्यक्ष देवीदास सातपुते, अशोक रेचनकर सकमुर,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तुकाराम झाडे, दरुरच्या सरपंच उषाताई धुडसे,युवक काँग्रेस अध्यक्ष संतोष बंडावार,नामदेव सांगडे, जितेंद्र गोहणे,अनिल कोरडे,शंकर येलमुले,संजय झाडे,पुरुषोत्तम रेचनकर,शालिक झाडे,दुर्गे सर,सुनील झाडे,राजू राऊत, धिरेंद्र नागापूरे,विजय एकोनकार,श्री.पुरमशेत्तीवार साहेब, श्री.पगाडे साहेब, निधी चौधरी,भास्कर भोयर,बालाजी चनकापुरे यासह गावातील प्रतिष्ठित व परिसरातील प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
प्रास्ताविक बालाजी चनकापुरे यांनी केले तर देवीदास सातपुते,अशोक रेचनकर,संजय झाडे, नामदेव सांगडे यांनी आपापल्या भाषणातून मार्गदर्शन केले.आणि दरुर समता युवक मंडळांनी आभार मानले.