अनुकंपाधारक उमेदवारांची कागदपत्रे तपासणी आता 12 नोव्हेंबर रोजी

46

अनुकंपाधारक उमेदवारांची कागदपत्रे तपासणी आता 12 नोव्हेंबर रोजी

अनुकंपाधारक उमेदवारांची कागदपत्रे तपासणी आता 12 नोव्हेंबर रोजी
अनुकंपाधारक उमेदवारांची कागदपत्रे तपासणी आता 12 नोव्हेंबर रोजी

✍मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
9860020016

बुलडाणा :- जिल्हा परिषद बुलडाणा अंतर्गत अनुकंपाधारक उमेदवारांचे एकूण 331 उमेदवारांची ज्येष्ठता यादीतील ज्येष्ठता सूची व शैक्षणिक पात्रता धारण करणाऱ्या व सरळसेवेच्या आरक्षीत रिक्त पदांवर पात्र उमेदवारांची तात्पुरती निवड यादी यापूर्वी 15.9.2021 रोजी जि.पच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. या यादीवर लेखी आक्षेप मागविण्यात आले होते. त्यानुसार तात्पुरत्या निवड यादीवर प्राप्त आक्षेपांची सुनावणी घेवून पडताळणी करण्यात आली आहे. अनुकंपाधारक उमेदवार यांचे शैक्षणिक पात्रतेचे मुळ कागदपत्र व इतर आवश्यक कागदपत्रांची तपासणी करून समुपदेशन प्रक्रिया 9 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. मात्र अपरिहार्य कारणास्तव पात्र अनुकंपाधारक ही प्रक्रिया 12 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता श्री. छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, जि. प बुलडाणा येथे आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित रहावे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.