महाराष्ट्रात बैलगाडी शर्यत शंकरपटाची परत सुरुवात होणार, सुनील केदार यांची माहिती

51

युवराज मेश्राम ✒
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
📲 9766445348 📲
नागपुर:- महाराष्ट्र शासनाने बैलगाडी शर्यत म्हणजेच शंकरपट सुरू करण्याबाबत 2017 मध्ये कायदा संमत केला होता. परंतु, त्यास मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती दिली होती. त्यानंतर राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. पुढील आठवड्यात यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशा बैलगाड्यांच्या शर्यती म्हणजेच शंकरपट पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी दिली. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेबद्दल सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. शेखर नाफडे यांची सुनील केदार यांनी नवी दिल्लीत भेट घेतली. त्यानंतर बैलगाड्या शर्यती राज्यात सुरू होणार असल्याची ग्वाही केदार यांनी दिली.
महाराष्ट्र सरकारनं बैलगाडी शर्यत सुरू करण्याबाबत 2017 मध्ये कायदा संमत केला होता. परंतु, त्यास मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती दिली होती. त्यानंतर राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. पुढील आठवड्यात यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी सुनील केदार हे दिल्लीला गेले होते. तिथे त्यांनी ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. शेखर नाफडे यांची भेट घेतली.