बीडीएस प्रणाली बंद असल्यामुळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आले आर्थिक अडचणीत

55

बीडीएस प्रणाली बंद असल्यामुळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आले आर्थिक अडचणीत

बीडीएस प्रणाली बंद असल्यामुळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आले आर्थिक अडचणीत
बीडीएस प्रणाली बंद असल्यामुळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आले आर्थिक अडचणीत

विशाल गांगुर्डे, बदलापूर प्रतिनिधी
मोब. नं.- 9768545422

मुंबई : राज्यभर बीडीएस प्रणाली बंद असल्यामुळे अनेक शिक्षक, शिक्षकेतर पीएफ धारकांना हक्काचे पैसे मिळण्यास अडचणीचा सामना करावा लागत आहे. पैसे मिळत नसल्यामुळे मेटाकुटीला आलेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ‘शिक्षक भारती’ संघटनेच्या माध्यमातून राज्याचे अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना पत्र लिहून बीडीएस प्रणाली सुरू करण्याची मागणी केली आहे.

करोना विषाणूमुळे लावण्यात आलेल्या लाॅकडाउनमुळे अनेक कुटुंबाची आर्थिक स्थिती कोलमडली. त्यामुळे आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी अनेक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपला मोर्चा ‘पीएफ’ खात्यामधील पैसे काढण्याकडे वळवला. यासाठी अनेक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी वैयक्तिक कामे, मुलांच्या लग्नांसाठी, शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी, गृह कर्ज हफ्ता भरण्यासाठी ‘पीएफ’ खात्यातून पैसे मिळण्यासाठी अर्ज केले आहेत. मात्र, राज्यभर ‘बीडीएस’ प्रणाली बंद असल्यामुळे अनेक पीएफ धारकांना हक्काचे पैसे मिळण्यात अडचणी आल्या आहेत. यामुळे अनेक कर्मचारी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

‘पीएफ’ धारकांना हक्काचे पैसे मिळण्यासाठी बीडीएस प्रणाली सुरु करावी, अशी विनंती ‘शिक्षक भारती’चे अध्यक्ष अशोक बेलसरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना केली आहे. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना हक्काचे पैसे देणे ही शासनाची जबाबदारी असल्याची जाणीव देखील बेलसरे यांनी राज्य सरकारला पत्राद्वारे करून दिली आहे.