मतदार यादीत नाव नोंदणीसाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा मनपाचे उपायुक्त अशोक गराटे यांचे आवाहन
विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर

विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर
✍संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800
चंद्रपूर सविस्तर वृत्त खलील प्रमाणे आहे : भारत निवडणूक आयोग यांचे निर्देशानुसार 1 जानेवारी 2022 या अहर्ता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केलेला असून, मतदार यादी कार्यक्रमाचे अनुषंगाने 1 जानेवारी 22 रोजी वयाचे 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या सर्व पात्र मतदारास मतदार यादीत आपले नाव नोंदविणे शक्य होणार आहे. लोकशाही मजबूत करण्यासाठी शहरवासीयांनी मतदार यादीत नाव नोंदणीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मनपाचे उपायुक्त अशोक गराटे यांनी केले.
चंद्रपूर शहर महानगरपालिकेची निवडणूक २०२२ मध्ये होत आहे. त्या अनुषंगाने शहरातील मतदारांचा टक्का वाढविण्याच्या दृष्टीने राणी हिराई सभागृहात सोमवारी (ता. १५) मशीद पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली यावेळी अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल, उपायुक्त अशोक गराटे, सहाय्यक आयुक्त विद्या पाटील यांची उपस्थिती होती.
सर्व मतदारांनी आपले नाव मतदार यादीत तपासून पहावे, नाव आढळून न आल्यास नमुना क्र.6 सर्व आवश्यक कागदपत्रासह सादर करावा. तसेच नवीन मतदारांनी 1 जानेवारी 2022 रोजी 18 वर्ष पूर्ण होणाऱ्या सर्व पात्र मतदारांनी मतदार नोंदणी कार्यक्रमाचे औचित्य साधून न चुकता आपले नाव मतदार यादीत नोंदविण्याचे आवाहन अशोक गराटे यांनी केले.
ज्या मतदारांना मतदार यादीतून नाव वगळायचे आहे, मतदार यादीतील मजकूर दुरुस्त करून घ्यावयाचा आहे किेंवा एकाच मतदार