कोरपणा तालुक्यातील इरई येथील अनेकाचा युवा स्वाभिमान पक्षामध्ये प्रवेश.

72

कोरपणा तालुक्यातील इरई येथील अनेकाचा युवा स्वाभिमान पक्षामध्ये प्रवेश.

राजुरा विधानसभा क्षेत्रांमधील कोरपणा तालुक्यातील इरई येथील अनेकाचा युवा स्वाभिमान पक्षामध्ये प्रवेश.
कोरपणा तालुक्यातील इरई येथील अनेकाचा युवा स्वाभिमान पक्षामध्ये प्रवेश.

✍सौ.हनिशा दुधे✍
तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
📱मो 9764268694📱

कोरपना:- सविस्तर वृत्त असे की युवा स्वाभिमान पार्टीचे कोरपणा पंचायत समिती सर्कल अध्यक्ष निखिल पिदूरकर यांच्या कार्याला प्रेरित होऊन आणि जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने दि. 16 नोव्हें  ला युवा स्वाभिमान पार्टीच्या इरई येथील जनसंपर्क कार्यालयामध्ये विविध पक्षातील पुरुष व तरुणांचा युवा स्वाभिमान पक्षात सर्कल अध्यक्ष निखिल पिदूरकर यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करण्यात आला. त्याचबरोबर पक्षाची जुळलेल्या नवीन सदस्यांनी आपल्या तालुक्यातील व गावातील विविध समस्या सर्कल अध्यक्ष याच्या मार्फत जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे यांना सांगितल्या व जिल्हाध्यक्षांनी लवकरच सदर नागरिकांना समस्या मार्गी लावण्याचे सकारात्मक आश्वासन दिले.

या वेळी प्रवेश करणारे बंडू जुनघरी, समीर वरारकर, भरत भोयर, राजेंद्र वरारकर आदींनी यावेळी युवा स्वाभिमान पक्षाचे इरई येथील शाखा अध्यक्ष बाळकृष्ण भोयर, शाखा सचिव धनराज भगत, शाखा प्रमुख सुनील तेलंग, सदस्य अखिल निखाडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.