समुद्रपूर तालुक्यातील मांडगाव येथील परिवाराचा भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू , 4 जण गंभीर जखमी.

53

समुद्रपूर तालुक्यातील मांडगाव येथील परिवाराचा भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू , 4 जण गंभीर जखमी.

समुद्रपूर तालुक्यातील मांडगाव येथील परिवाराचा भीषण अपघात,
समुद्रपूर तालुक्यातील मांडगाव येथील परिवाराचा भीषण अपघात

✍ अक्षय बहादे ✍
समुद्रपूर तालुका प्रतिनिधी
📱 9545559551📱

समुद्रपूर,दि.17 नोव्हें:- समुद्रपूर तालुक्यातील मांडगाव येथिल चंदनखेडे परीवार सासुरवाडीला जात असताना १६ नोव्हेंबर च्या रात्रीच्या सुमारास कार अनियंत्रित होऊन पुलाच्या खाली घुसल्याने कार चालक जागीच ठार झाल्याची घटना घडली, तर कार मधील 4 जण गंभीर जखमी झाले आहे. यवतमाळ जिल्यातील राळेगाव तालुक्यातील वडकी पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या चहांद येथे ही घटना घडली.

मांडगाव येथून सासुरवाडीला आपला परिवार घेवून कार क्रमांक MH 30 B 3131 टाटा सफरीने जात होते. दरम्यान पुलावर हे दुर्घटना घडली, या घटनेची माहिती मिळताच वडकी पोलीस घटनास्थळी पोहचले, टाटा सफारी चालक कैलास चंदनखेडे वय 42 वर्षे ते जागीच ठार झाले होतें, त्यांच्या पत्नी मंजुषा चंदनखेडे वय 38 वर्षे त्या गंभीर जखमी असल्याने त्यांना राळेगाव येथून नागपूर येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले, तर आयुष तडस
शेडगाव वय 13 वर्ष , गुडीया चंदनखेडे वय 12 वर्षे, स्वराज चंदनखेडे वय 8 वर्ष यांना उपचार्थ सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मांडगाव येथील सहकारी दोन त्यांचे मित्र यांना या घटनेमधील कुठलीही इजा झाली नाही आहे, पुढील तपास वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनायक जाधव करीत आहे, मात्र मांडगाव गावामध्ये शोककळा पसरली आहे.