राजुरा तालुक्याती आदिवासी बांधवांची पाणी, वीजपुरवठा, रस्त्यासाठी जिल्हाधिकारी यांचेकडे मागणी.
● आदिवासी प्रकल्प अधिकारी यांची भेट
● रस्ता करून देण्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाचे आश्वासन.

✍संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800
राजुरा:- तालुक्यातील बागलवाही, बापूनगर, येथील कोलाबांधवांनी पाणी, वीजपुरवठा, रस्त्यासाठी जिल्हाधिकारी यांचेकडे मागणी केली असून गावात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून हातपंप, रस्ता, नसून वीजपुरवठा नसल्याने आदिवासी बांधवांना अंधारात जिवन जगावे लागत असून सर्प, विंचू, हिंस्त्र प्राण्याचा जिवाला धोका निर्माण झाला असल्याने मूलभूत सुविधा देण्याची मागणी जिल्हाधिकारी यांचे कडे करण्यात आली. मूलभूत सुविधा होण्यास वनविभाग विरोध करीत असल्याने कोलाम बांधवांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत असून शासनाने याकडे लक्ष द्यावे.

स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतर पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असेल तर ही बाब सविधानाचे अपमान करणारी असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते तथा श्रमिक एल्गारचे उपाध्यक्ष घनश्याम मेश्राम यांनी व्यक्त केले असून तसेच आदिवासी प्रकल्प अधिकारी रोहन घुगे यांची भेट घेऊन वास्तविकता निदर्शनास आणून देण्यात आली. यावेळी श्रमिक एल्गार चे अध्यक्ष प्रविण चिचघरे, उपाध्यक्ष घनशाम मेश्राम, महासचिव डॉ. कल्याण कुमार, भीमराव कुमरे, मारोती भिमु कुमरे, भोजू आत्राम, भिमु आत्राम, जलमा सिडाम, माधू आत्राम, शंकर आत्राम, मारू सिडाम उपस्थित होते.