दरूर -किरमिरी सिंचन प्रकल्पाच्या नहराची ऐसीतैसी* *डोंगरगावला जाणार कालवा भुई सपाट होण्याच्या मार्गावर*

49

*दरूर -किरमिरी सिंचन प्रकल्पाच्या नहराची ऐसीतैसी*

*डोंगरगावला जाणार कालवा भुई सपाट होण्याच्या मार्गावर*

दरूर -किरमिरी सिंचन प्रकल्पाच्या नहराची ऐसीतैसी* *डोंगरगावला जाणार कालवा भुई सपाट होण्याच्या मार्गावर*
दरूर -किरमिरी सिंचन प्रकल्पाच्या नहराची ऐसीतैसी*
*डोंगरगावला जाणार कालवा भुई सपाट होण्याच्या मार्गावर*

गोंडपीपरी:- तालुक्यात किरमिरी-दरूर उपसा सिंचन योजना कार्यरत आहे.या सिंचन योजनेद्वारे शेतकऱयांना सिंचन सुविधा मिळाली.
मात्र पाटबंधारे विभागाच्या गलथान कारभारामुळे डोंगरागावला जाणार हा कालवा भुईसपाट होत आहे.
कारण या नहराच्या पाळीवरून मुरमाची जड वाहतूक सूरु करण्यात आली आहे.
यामुळे कालव्याच्या पाळीची नुकसान होत आहे.अनेक ठिकाणी पाळ फुटली आहे तर काही ठिकाणी पाळी वर खडे पडले आहेत.
या विषयी संबंधित ठेकेदाराने पाटबंधारे विभागाने आम्हला परवानगी दिल्याचे सांगत आहे.
सदर वाहतुकी मुळे जे नुकसान होईल ते नुकसान भरून काढा अन मोकळे व्हा असे सूचना पाट बंधारे विभागाने दिल्याचे ठेकेदार सांगत सुटला आहे.
या बाबत चंद्रपूर पाट बंधारे विभागाचे उप अभियंता राजू पुलावर यांच्याशी भ्रम्हण ध्वनिवर संपर्क साधला असता पुलावार म्हणाले की, ठेकेदार खोटे बोलत असून तशी कुठलीच परवानगी दिली नसल्याची माहिती चंद्रपूर पाटबंधारे विभागाचे उपअभियंता राजू पुलावर यांनी आज दि.17 नोव्हेंबर रोज बुधवारला दिली आहे.