पोलिस शिपायाने घेतली सात हजाराची लाच ACB नं रंगेहाथ पकडलं

54

पोलिस शिपायाने घेतली सात हजाराची लाच

ACB नं रंगेहाथ पकडलं

पोलिस शिपायाने घेतली सात हजाराची लाच ACB नं रंगेहाथ पकडलं
पोलिस शिपायाने घेतली सात हजाराची लाच
ACB नं रंगेहाथ पकडलं

राजेंद्र झाडे
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

आष्टी:- गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत पोलीस नाईक सुरेश दुर्गे याला आज रात्री लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सात हजाराची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.
9 नोव्हेंबरला दोन व्यक्तींमध्ये भांडण झाले. यात ज्याच्याविरुद्ध तक्रार आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस नाईक सुरेश दुर्गे याने 10 हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडअंती 7 हजारावर डील करण्यात आली होती.
त्याअनुषंगाने 17 नोव्हेंबरला रात्री 7 हजार रुपयांची लाच घेताना दुर्गे याला रंगेहात पकडण्यात आले,अशी माहिती लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुरेंद्र गरड यांनी दिली. या पोलीस स्टेशनमध्ये या अगोदर ही 17 सप्टेंबरला दोन पोलिस कर्मचारी दारु पकडल्याप्रकरणी तडजोड करण्यासाठी लाच घेतांना रंगेहात पकडल्या गेले होते. दोन महिन्यांच्या कालावधीतच ही दुसरी लाचेची घटना घडली आहे. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती.