जिल्ह्यात लसीकरणाला वेग
जिल्ह्यात 61 टक्के नागरिकांचा पहिला
तर 46 टक्के नागरिकांचा लसीकरणाचा दुसरा डोस पूर्ण

जिल्ह्यात 61 टक्के नागरिकांचा पहिला
तर 46 टक्के नागरिकांचा लसीकरणाचा दुसरा डोस पूर्ण
✍मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्यूरो चीफ
9860020016
अमरावती : – अमरावती विभागात कोविड लसीकरणाला चांगला वेग आला आहे. शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकही स्वयंस्फूर्तीने चांगला प्रतिसाद देत आहेत. कोरोना साथ रोगाच्या नियंत्रणासाठी लसीकरणाचे दोन्ही डोस घेणे गरजेचे आहे. यामुळे ज्या नागरिकांनी लसीकरणाचा दुसरा डोस अद्याप घेतला नाही त्यांनी जवळच्या लसीकरण केंद्रावर जावून लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे.
कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण मोहिम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. यासाठी जिल्हा प्रशासन तसेच आरोग्य यंत्रणा सुक्ष्म तसेच योग्य नियोजन करीत आहे.
जिल्ह्यातील सर्व उद्योग, कंपन्या, कारखाने, औद्योगिक व खाजगी आस्थापना तसेच शासकीय कार्यालयातील कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांचे लसीकरण शंभर टक्के पूर्ण करुन घेण्यासाठी प्रशासनाने स्प्ष्ट सूचना दिल्या आहेत.
अमरावती विभागातील अचलपूर तालुक्यातील 2 लक्ष 16 हजार 980 लोकसंख्येपैकी 54.80 टक्के नागरिकांनी लसीकरणाचा पहिला डोस घेतला असून 36.64 टक्के नागरिकांनी कोविड लसीकरणाचा दुसरा डोस घेतला आहे. आतापर्यंत अचलपूर येथील 1 लक्ष 62 हजार 469 नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
अमरावती तालुक्यातील 1 लक्ष 2 हजार 301 लोकसंख्येपैकी 70.47 टक्के नागरिकांनी लसीकरणाचा पहिला डोस घेतला असून 47.94 टक्के नागरिकांनी कोविड लसीकरणाचा दुसरा डोस घेतला आहे. आतापर्यंत अमरावती येथील 1 लक्ष 6 हजार 656 नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील 1 लक्ष 21 हजार 594 लोकसंख्येपैकी 60.21 टक्के नागरिकांनी लसीकरणाचा पहिला डोस घेतला असून 41.15 टक्के नागरिकांनी कोविड लसीकरणाचा दुसरा डोस घेतला आहे. आतापर्यंत अंजनगाव सुर्जी येथील 1 लक्ष 3 हजार 348 नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
भातकुली तालुक्यातील 83 हजार 168 लोकसंख्येपैकी 72.74 टक्के नागरिकांनी लसीकरणाचा पहिला डोस घेतला असून 51.33 टक्के नागरिकांनी कोविड लसीकरणाचा दुसरा डोस घेतला आहे. आतापर्यंत भातकुली येथील 91 हजार 545 नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
चांदूरबाजार तालुक्यातील 1 लक्ष 43 हजार 823 लोकसंख्येपैकी 64.60 टक्के नागरिकांनी लसीकरणाचा पहिला डोस घेतला असून 35.77 टक्के नागरिकांनी कोविड लसीकरणाचा दुसरा डोस घेतला आहे. आतापर्यंत चांदूरबाजार येथील 1 लक्ष 26 हजार 147 नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
चांदूररेल्वे तालुक्यातील 73 हजार 184 लोकसंख्येपैकी 71.15 टक्के नागरिकांनी लसीकरणाचा पहिला डोस घेतला असून 47.37 टक्के नागरिकांनी कोविड लसीकरणाचा दुसरा डोस घेतला आहे. आतापर्यंत चांदूररेल्वे येथील 76 हजार 736 नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
चिखलदारा तालुक्यातील 1 लक्ष 82 लोकसंख्येपैकी 28.77 टक्के नागरिकांनी लसीकरणाचा पहिला डोस घेतला असून 22.98 टक्के नागरिकांनी कोविड लसीकरणाचा दुसरा डोस घेतला आहे. आतापर्यंत चिखलदरा येथील 35 हजार 414 नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
दर्यापूर तालुक्यातील 1 लक्ष 33 हजार 213 लोकसंख्येपैकी 68.93 टक्के नागरिकांनी लसीकरणाचा पहिला डोस घेतला असून 42.25 टक्के नागरिकांनी कोविड लसीकरणाचा दुसरा डोस घेतला आहे. आतापर्यंत दर्यापूर येथील 1 लक्ष 30 हजार 613 नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
धामणगाव रेल्वे तालुक्यातील 98 हजार 553 लोकसंख्येपैकी 71.94 टक्के नागरिकांनी लसीकरणाचा पहिला डोस घेतला असून 43.90 टक्के नागरिकांनी कोविड लसीकरणाचा दुसरा डोस घेतला आहे. आतापर्यंत धामणगाव रेल्वे येथील 1 लक्ष 2 हजार 27 नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
धारणी तालुक्यातील 1 लक्ष 56 हजार 506 लोकसंख्येपैकी 34.61 टक्के नागरिकांनी लसीकरणाचा पहिला डोस घेतला असून 23.89 टक्के नागरिकांनी कोविड लसीकरणाचा दुसरा डोस घेतला आहे. आतापर्यंत धारणी येथील 67 हजार 113 नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
मोर्शी तालुक्यातील 1 लक्ष 37 हजार 678 लोकसंख्येपैकी 61.22 टक्के नागरिकांनी लसीकरणाचा पहिला डोस घेतला असून 36.61 टक्के नागरिकांनी कोविड लसीकरणाचा दुसरा डोस घेतला आहे. आतापर्यंत मोर्शी येथील 1 लक्ष 15 हजार 132 नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील 1 लक्ष 13 हजार 554 लोकसंख्येपैकी 55.84 टक्के नागरिकांनी लसीकरणाचा पहिला डोस घेतला असून 40.73 टक्के नागरिकांनी कोविड लसीकरणाचा दुसरा डोस घेतला आहे. आतापर्यंत अंजनगाव सुर्जी येथील 89 हजार 228 नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
तिवसा तालुक्यातील 79 हजार 16 लोकसंख्येपैकी 82.94 टक्के नागरिकांनी लसीकरणाचा पहिला डोस घेतला असून 42.35 टक्के नागरिकांनी कोविड लसीकरणाचा दुसरा डोस घेतला आहे. आतापर्यंत तिवसा येथील 93 हजार 294 नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
वरुड तालुक्यातील 1 लक्ष 69 हजार 460 लोकसंख्येपैकी 72.20 टक्के नागरिकांनी लसीकरणाचा पहिला डोस घेतला असून 45.09 टक्के नागरिकांनी कोविड लसीकरणाचा दुसरा डोस घेतला आहे. आतापर्यंत वरुड येथील 1 लक्ष 77 हजार 530 नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
तसेच अमरावती महापालिका क्षेत्रामध्ये 5 लक्ष 32 हजार 384 लोकसंख्येपैकी 59.84 टक्के नागरिकांनी लसीकरणाचा पहिला डोस घेतला असून 62.17 टक्के नागरिकांनी कोविड लसीकरणाचा दुसरा डोस घेतला आहे. आतापर्यंत अमरावती महापालिका क्षेत्रामध्ये येथील 5 लक्ष 16 हजार 615 नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
अमरावती विभागामध्ये एकूण 22 लक्ष 61 हजार 496 लोकसंख्येपैकी 13 लक्ष 69 हजार 533 नागरिकांनी लसीकरणाचा पहिला डोस घेतला असून त्याची टक्केवारी 60.56 एवढी आहे. तर कोविड लसीकरणाचा दुसरा डोस 6 लक्ष 24 हजार 334 नागरिकांनी घेतला असून त्याची टक्केवारी 45.59 एवढी आहे. विभागात 19 लक्ष 93 हजार 867 नागरिकांचे लसीकरण झाले आहे.