नागपुर: अखेर सरकारला आली जाग, झेडपीच्या विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा निधीचा मार्ग मोकळा.

60

नागपुर: अखेर सरकारला आली जाग, झेडपीच्या विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा निधीचा मार्ग मोकळा.

नागपुर: अखेर सरकारला आली जाग, झेडपीच्या विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा निधीचा मार्ग मोकळा.
नागपुर: अखेर सरकारला आली जाग, झेडपीच्या विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा निधीचा मार्ग मोकळा.

✒ युवराज मेश्राम ✒
नागपूर जिल्हा प्रतिनिधी
📲 9766445348 📲

नागपूर:- सरकार द्वारा जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी दोन गणवेशाची रक्कम दिली जाते. ही गणवेशाची रक्कम सरकार शाळेच्या खात्यावर जमा करत असते. पण कोरोना वायरसच्या महामारीमुळे माघील अनेक महिन्या पासुन शाळा बंद होत्या. त्यामुळं आतापर्यंत हा गणवेशाची रक्कम शाळांना मिळाला नव्हता. राज्य शिक्षण परिषदेने एक कोटी 98 लाख 64 हजारांचा निधी शिक्षण विभागाकडे वर्ग केला आहे. अर्धेच सत्र उरल्यानं दोन ऐवजी यंदा एकच ड्रेस मिळणार आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी गरीब असतात. त्यामुळं त्यांना केंद्र आणि राज्य सरकार गणवेशासाठी विशिष्ट रक्कम वर्ग करते. नागपूर जिल्हा परिषदेच्या पहिली ते आठवीच्या 66 हजार 216 विद्यार्थ्यांना हे गणवेश शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून मिळणार आहेत.

महानगर पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेशासाठी मिळणार निधी.

नागपूर येथील महानगर पालिकेच्या शाळांतील शिकणारा सात हजार 733 विद्यार्थ्यांना गणवेशासाठी मदत मिळणार आहे. यासाठी 23 लाख 19 हजार 900 रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला 300 रुपयांप्रमाणे अनुदान केंद्र व राज्य शासनाने पाठविले आहे. यामध्ये केंद्र सरकारचा 60 टक्के तर 40 टक्के राज्य सरकारचा हिस्सा आहे. जिल्हा परिषदेच्या तिजोरीतून हा निधी संबंधित शाळांच्या बँकेच्या खात्यात पाठविला जाणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मिळणार आहे.

समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत एससी, एसटी व बीपीएल प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येतो. या योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला सुमारे चार कोटी 37 लाखांच्या निधीची गरज होती. परंतु, अर्धाच निधी मिळाल्याने शैक्षणिक सत्र एकाच गणवेशावर काढण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे. सध्यातरी उर्वरित निधी मिळणार की नाही हे स्पष्ट झाले नाही.