अमृत व भूमिगत गटार योजनेचा नगरविकास राज्यमंत्र्यांकडून आढावा तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करण्याचे आदेश कंत्राटदाराची अनामत रक्कम जप्त करण्याचे निर्देश

56

अमृत व भूमिगत गटार योजनेचा नगरविकास राज्यमंत्र्यांकडून आढावा
तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करण्याचे आदेश
कंत्राटदाराची अनामत रक्कम जप्त करण्याचे निर्देश

अमृत व भूमिगत गटार योजनेचा नगरविकास राज्यमंत्र्यांकडून आढावा तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करण्याचे आदेश कंत्राटदाराची अनामत रक्कम जप्त करण्याचे निर्देश
अमृत व भूमिगत गटार योजनेचा नगरविकास राज्यमंत्र्यांकडून आढावा
तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करण्याचे आदेश
कंत्राटदाराची अनामत रक्कम जप्त करण्याचे निर्देश

✒आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा

वर्धा, दि.१९/११/२१ :-वर्धा शहरात अमृत योजना व भूमिगत गटार योजनेचे काम सुरु आहे. या योजनेच्या अंमलबजावणी बाबत प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी या दोनही योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करुन एक महिन्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.
यावेळी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, माजी केंद्रिय राज्यमंत्री सुबोध मोहिते, माजी जि. प. उपाध्यक्ष सुनिल राऊत, जिल्हा प्रशासन अधिकारी मनोजकुमार शहा, मुख्याधिकारी राजेश भगत, जीवन प्राधिकरण व बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच नगर परिषद सदस्य उपस्थित होते.
शहरात अमृत व भूमिगत गटार योजनेचे कामे सुरु असून या योजनेच्या गुणवत्ते बाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहे. त्या तक्रारीचा राज्यमंत्री महोदयांनी आढावा घेतला. या कामात गैरप्रकार झाला असल्यास सबंधित अभियंत्यांवर कार्यवाही करण्यात यावी तसेच कामाचा चौकशी अहवाल एक महिन्यात सादर करावा, असे निर्देश त्यांनी संबधित अधिका-यांना दिले. कामाची तपासणी नागपूर येथील व्ही.एन.आय.टी. या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या तज्ञांकडून करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
भूमिगत गटार योजने अंतर्गत रस्त्याचे खोदकाम होणार आहे, याची कल्पना असतांना सुध्दा रस्त्यांच्या दुरुस्तीवर मोठया प्रमाणावर खर्च करण्यात आला आणि हे रस्ते गटाराच्या कामासाठी काही दिवसातच परत खोदण्यात आले. त्यामुळे शासनाच्या पैशाचा अपव्यय झाला आहे. याबाबतही सविस्तर अहवाल सादर करण्यात यावा. योजनेप्रमाणे शहरातील सर्व भागात पाईपलाईन टाकणे आवश्यक असतांना काही ठिकाणी कत्राटदारांनी पाईप लाईन टाकली नाही त्या कत्राटदाराची ठेव रक्कम जप्त करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. या दोन्हीही योजनेचा हिंगणघाट शहरात सुरु असलेल्या कामाचाही त्यांनी आढावा घेतला.