नोकरी करणा-या महिलांनी वसतीगृह योजनेचा लाभ घ्यावा

50

नोकरी करणा-या महिलांनी वसतीगृह योजनेचा लाभ घ्यावा

नोकरी करणा-या महिलांनी वसतीगृह योजनेचा लाभ घ्यावा
नोकरी करणा-या महिलांनी वसतीगृह योजनेचा लाभ घ्यावा

आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा

वर्धा, : १९/११/२१ नोकरी करणा-या महिलांसाठी सुरक्षित आणि सोईस्कर ठिकाणी राहण्याची सोय उपलब्ध व्हावी यासाठी केंद्र शासनाच्या वतीने वसतीगृह योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा अविवाहित, विधवा, घटस्फोटीत , विभग्त, विवाहित परंतु ज्यांचे पती किंवा जवळचे कुटुंब त्याच शहरात राहत नाही अशा नोकरी करणा-या महिलांनी वसतीगृह योजनेचा लाभ घ्यावा.
ज्या महिलेचे एकुण उत्पन्न 35 हजार पेक्षा जास्त नाही. अशा महिलांना मुलासह वसतीगृहात प्रवेश दिला जाणार आहे. तसेच नोकरी मिळविण्यासाठी प्रशिक्षण घेत असलेल्या महिलांनाही वसतीगृहात प्रवेश देण्यात येणार आहे. नोकरी करणा-या महिलेसोबत 18 वर्षापर्यंतची मुलगी व 5 वर्षापर्यंतच्या मुलगा वसतीगृहात राहू शकेल.
वसतीगृहात प्रवेश दिलेल्या नोकरी करणा-या व नोकरीसाठी प्रशिक्षण घेणा-या महिलेकडून सिंगल बेडरुमसाठी एकुण मासिक पगाराच्या 15 टक्के, डबल बेडरुमसाठी 10 टक्के व डॉरमेट्रीसाठी 7.5 टक्के पेक्षा जास्त दर घेतला जाणार नाही. जिल्हयात कस्तुरबा हेल्थ सोसायटी सेवाग्राम व्दारा संचालित, सेवाग्राम येथे व मातृसेवा संघ वर्धा व्दारा संचालित रामनगर येथे महिलांसाठी वसतीगृह उपलब्ध आहे, अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा,असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी कळविले आहे.