चंद्रपुरात दीड कोटीचा दरोडा, चाकू आणि बनावती पिस्तुलाचा वापर,5 दरोडेखोरांना 15 तासात पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

52

चंद्रपुरात दीड कोटीचा दरोडा, चाकू आणि बनावती पिस्तुलाचा वापर,5 दरोडेखोरांना 15 तासात पोलिसांनी ठोकल्या बेड्या

         ==== मुख्य मुद्दे ====
● चंद्रपुर शहरात बुधवारी उच्चभ्रू वस्तीत पडला दरोडा.
● दरोड्यात 1 कोटी 73 लाखांची रक्कम पोलिसांनी केली जप्त.
● 5 दरोडेखोर आरोपींना पोलिसानी अवघ्या 15 तासात अटक करून ठोकल्या बेड्या.

चंद्रपुरात दीड कोटीचा दरोडा, चाकू आणि बनावती पिस्तुलाचा वापर,5 दरोडेखोरांना 15 तासात पोलिसांनी ठोकल्या बेड्या
चंद्रपुरात दीड कोटीचा दरोडा, चाकू आणि बनावती पिस्तुलाचा वापर,5 दरोडेखोरांना 15 तासात पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मनोज खोब्रागडे

मध्य महाराष्ट्र ब्यूरो चीफ 

9860020016

चंद्रपूर:- चंद्रपुर शहरात एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. शहरातील उच्चभ्रू वस्तीत काही दरोडेखोरानी दरोडा टाकुन कोरोडो रुपये लपास केले होते. अखेर त्याचा छडा लावण्यास पोलिसांना यश आले आहे. दरोड्यातील 1 कोटी 73 लाखांची रक्कम पोलिसांनी जप्त केली असून या कारवाईत 5 दरोडेखोर आरोपींना अटक करण्यात आलंय. शहरातल्या अरविंदनगर येथील ठोक अंडेविक्री व्यावसायिक खालिद कोळसावाला यांची घरी हा दरोडा पडला होता.

प्राप्त माहितीनुसार बुधवारी संध्याकाळच्या सुमारास चंद्रपुरच्या अरविंदनगर येथील राहणा-या अंडेचे ठोक व्यापारी खालिद कोळसावाला यांच्या घरी दरोडा पडला होता. त्यांच्या घरी 2 वृद्ध महिला असताना चाकू आणि खेळण्यातल्या पिस्तुलचा वापर करत आरोपींनी प्रवेश करत केला होता. घरात घुसलेल्या दरोडेखोरांनी दिवाणात लपविलेल्या रोख रकमेच्या पिशव्या घेऊन पळ काढला होता. यावेळी चोरट्यांनी लाखो रुपये चोरले होते.

त्या दरोडयाचा तपास करुन पोलिसांनी दरोडेखोराना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शना खाली सुरु आहे.