‘निवडणुकीत हरवा, भाजपची चांगली जिरवा’: ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

✒ युवराज मेश्राम ✒
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
📲 9766445348 📲
नागपुर/मुंबई:- केंद्रा मधील मोदी सरकारने तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा आज सकाळी केली आहे. या कृषी कायद्या वरुन विरोधी पक्षांतील नेत्यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडल आहे. त्यात महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनीही पंतप्रधानांच्या धोरणावर जोरदार टीका करताना भाजपला
सळळ आव्हान दिलंय. ‘अखेर तीन कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्याने शेतकरी आंदोलन आणि एकजुटीचा विजय झाला आहे आता ताकद दाखवून, निवडणुकीत हरवा आणि भाजपची चागली जिरवा’ असं आवाहन राऊत यांनी केलं आहे.
शेतकऱ्यांनी बलिदान करून आणि प्रचंड संघर्ष करून या काळ्या कायद्यांपासून मुक्ती मिळवली आहे. सध्या काही लोक स्वातंत्र्य हे भीक मागून मिळाले असे बरळत असताना स्वातंत्र्य हे भीक मागून मिळत नाही, हे शेतकरी आंदोलन पाहून समजण्याइतपत प्रकाश त्यांच्या डोक्यात पडो हीच या निमित्ताने अपेक्षा आहे. जी सुबुद्धी मोदींना सुचली तशीच सुबुद्धी शेतकऱ्यांना खलिस्तानी ठरवणाऱ्या अविचारी लोकांना सुचो हीच या पार्श्वभूमीवर अपेक्षा असल्याचे डॉ. राऊत यांनी म्हटले आहे.