देशातील भाजपा सरकारच्या हुकुमशाही, पाखंडशाही, बेसुमार महागाई धोरणांमुळे सामान्य जनतेचे हाल: आमदार सुभाष धोटे

51

देशातील भाजपा सरकारच्या हुकुमशाही, पाखंडशाही, बेसुमार महागाई धोरणांमुळे सामान्य जनतेचे हाल: आमदार सुभाष धोटे

● दरुर येथे काँग्रेसचे दोन दिवसीय जनजागरण अभियान

देशातील भाजपा सरकारच्या हुकुमशाही, पाखंडशाही, बेसुमार महागाई धोरणांमुळे सामान्य जनतेचे हाल: आमदार सुभाष धोटे
मार्गदर्शन करताना आमदार सुभाष धोटे

✒️राजेंद्र झाडे✒️
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी
📲9518368177📲
गोंडपिपरी,दि.20 नोव्हें:- गोंडपिपरी तालुक्यातील दरुर या गावी राजुरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा.सुभाषभाऊ धोटे यांचे नेतृत्वात केंद्र सरकारच्या महागाई विरोधात काँग्रेसचा दोन दिवसीय जनजागरण अभियान सोहळा पार पडला.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. नानाभाऊ पटोले यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक 14 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाच्या वतीने जनजागरण अभियान राबविण्यात येत आहे.

राजुरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार सुभाषभाऊ धोटे यांचे नेतृत्वात गोंडपिपरी तालुक्यातील दरूर येथे 19 नोव्हेंबर रोजी शुक्रवारला देशाच्या प्रथम महिला पंतप्रधान भारतरत्न स्व. इंदिराजी गांधी, शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक, झाशीची राणी राणी लक्ष्मीबाई यांचे जयंतीची औचित्य साधून दोन दिवसीय अभियानाला सुरुवात करण्यात आली.

पहिल्या दिवशी गावात जनजागरण फलक, स्वागत फलक, उत्कृष्ट रांगोळ्या, घोषणा फलक लावण्यात आले. सायंकाळी 7.30 वाजता पाहुण्यांचे आगमन होताच स्वागत करण्यात आले व बॅण्ड पथक तसेच भजन दिंडीने गावाच्या मुख्य मार्गाने पाहुण्यांना कार्यक्रम स्थळी पोहोचविण्यात आले.

पाहुण्यांनी महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून सभेला सुरुवात केली.आमदार साहेबांसह विधानसभेतील तथा गोंडपिपरी तालुक्यातील अनेक मान्यवरांनी जनजागरण अभियानाअंतर्गत आपआपल्या मार्गदर्शनातून संबोधित केले. जनजागरण अभियान सोहळ्याच्या निमित्ताने गावातील कलात्मकता असलेल्या विद्यार्थिनींनी व महिलांनी उत्तम अशा रांगोळ्या टाकल्या होत्या. या कौशल्याचे कौतुक करून आमदार साहेबांच्या हस्ते प्रथम, द्वितीय, तृतीय असे बक्षीस देण्यात आले.

लगेचच गावातील जेवणाचा कार्यक्रम आटोपून लोकशाहीर बाबुराव जुमनाके व सचिन फुलझेले व त्यांच्या संचाने जनजागरण अभियान अंतर्गत जनजागर सोहळ्यातून संगीतमय प्रबोधन केले व जागृती भजन मंडळाचे माध्यमांतून जनजागरण करण्यात आले.

दि.20 नोव्हेंबर शनिवारला सकाळी 7.00 वाजता परिसरातील कार्यकर्ते, गावातील भजन मंडळी,लेझीम पथक,दिंडी ने शेतकरी, शेतमजूर, युवक, महिला यांचे समवेत गावात मुख्य मार्गाने प्रभात फेरी काढून गावातील मुख्य चौकात आमदार साहेबांनी पुन:च्छ संबोधित करताना मार्गदर्शन केले.दरम्यान जितेंद्र गोहणे यांची गोंडपिपरी काँग्रेस कमिटीच्या तालुका सोशल मीडिया प्रसिद्धी प्रमुख पदी नियुक्तीपत्र देत निवड केली. गावातील गावकऱ्यांनी साहेबाना शुभेच्छा देत जनजागरण अभियान कार्यक्रमाची सांगता झाली.

अध्यक्षीय मार्गदर्शन करताना आमदार सुभाषभाऊ धोटे म्हणाले की, जनतेला अच्छे दिनाचे खोटे स्वप्न दाखवणारे केंद्रातील मोदी सरकार बेसुमार दरवाढ करून सर्वसामान्यांचे हाल करत आहे, आपल्या निवडक व्यापारी मित्रांना फायदा पोचविण्यासाठी भाजपा सरकार सतत एक वर्ष शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळून आंदोलन कालावधीत शेकडो शेतकर्‍यांचा जीव गेल्यानंतर उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणूका जवळ येताच पंजाब मधील झालेला भाजपाचा दारुण पराभव पाहून स्वतःच लावलेले अन्यायकारक शेतकरी काळे कायदे परत घेऊन शेतकऱ्यांची माफी मागण्याचे सोंग करत आहे.या सरकारला सर्व सामान्य माणसाच्या जगणा मरण्याचे काहीही एक देणेघेणे नाही म्हणूनच कोरोना महामारी च्या तडाख्यात आर्थिक खाईत सापडलेल्या नागरिकांना इंधनावर बेशुमार कर लावून पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गैस, खाद्य तेल यांच्या किमतीत भरमसाठ वाढ करून सर्व सामन्यांचे गोरगरीब, जनतेचे कंबरडे मोडले आहे. केंद्र सरकार एका मागून एक सरकारी संस्थांचे खाजगीकरण करत असून महाराष्ट्रातील भाजपा नेते खाजगी संस्थांना शासनात (कायद्याने श्यक्य नसलेलं) विलगिकरण करण्यासाठी एस. टी.कर्मचारी समवेत आंदोलन राबवित आहे.अश्या या दुतोंडी सरकार, कुचकामी, तानाशाही, पाखंडी सरकारला जनतेने धडा शिकवावा. मी करे सो कायदा अशी वागणूक दाखवणाऱ्या मोदी सरकारला त्यांचे दिवस भरलेले आहेत हे जनतेने दाखवले पाहिजे. असे मार्गदर्शन जनजागरण अभियान दरम्यान आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी आपल्या भाषणातून केले.

या प्रसंगी राजुरा नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुरेशराव चौधरी, तालुकाध्यक्ष तुकाराम झाडे, कार्याध्यक्ष निलेश संगमवार, तालुका काँग्रेस महिला अध्यक्ष रेखाताई रामटेके, शहराध्यक्ष देवेंद्र बट्टे,युवक अध्यक्ष संतोष बंडावार, अशोक रेचनकर, राजीव चंदेल, शहराध्यक्ष देवेंद्र बट्टे, तुकेष वानोळे, प्रा. शंभूजी येलेकर, युवक अध्यक्ष संतोष बंडावार, निराधार समितीचे अध्यक्ष विनोद नागापुरे, देविदास सातपुते, अनु जाती अध्यक्ष गौतम झाडे, नामदेव सांगडे, राजू राऊत, राकेश पुन, सुनील फुकट, सचिन फुलझेले,अनिल कोरडे, जितेंद्र गोहने, शंकर येलमुले, बालाजी चणकापूरे, बबलू कुळमेथे, सिनु कंदनूरीवार, आशीर्वाद पिपरे, सोनू पाल, आनंदराव कोडापे, पोचमललू उल्लेंदला, विनोद जाक्कुलवार निधी चौधरी, संजय झाडे, शालिक झाडे, पुरुषोत्तम रेचनकर, दर्शनाताई दुर्गे, कोंदेकर ताई, धुडसेभाऊ, विजू एकोणकर यासह परिसरातील कार्यकर्ते व गावातील नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे, निलेशभाऊ संगमवार, रेखाताई रामटेके, राजीवसिंह चंदेल, सुरेशराव चौधरी, रेडीजी यांनी आपापल्या भाषणातून मार्गदर्शन केले. प्रास्ताविक बालाजी चनकापुरे यांनी केले तर सचिन फुलझेले यांनी सूत्र संचालन केले व गावकऱ्यांनी आभार मानले.