कारवाईसाठी तलाठ्याचे वरिष्ठांकडे बोट ? वनविभागाचेही दुर्लक्ष डोंगरगाव येथिल मुरुम प्रकरण

47

कारवाईसाठी तलाठ्याचे वरिष्ठांकडे बोट ?

वनविभागाचेही दुर्लक्ष

डोंगरगाव येथिल मुरुम प्रकरण

कारवाईसाठी तलाठ्याचे वरिष्ठांकडे बोट ? वनविभागाचेही दुर्लक्ष डोंगरगाव येथिल मुरुम प्रकरण
कारवाईसाठी तलाठ्याचे वरिष्ठांकडे बोट ?
वनविभागाचेही दुर्लक्ष
डोंगरगाव येथिल मुरुम प्रकरण

राजेंद्र झाडे
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपिपरी:-शासनाचा कुठलाही परवाना नसतांना धाबा,डोंगरगाव शिवारात चुनखडीयुक्त मुरूनाची अवैध उत्खनन आणि त्याच्या वाहतुकीचा बेकायदेशीर प्रकार समोर आला.या सबंधिचे व्हिडिओ फुटेज व पुरावा म्हणून अनेक फोटो धाबा येथील तलाठी ओंकार भदाडे यांच्याकडे दि.१७ रोजी सादर करण्यात आले.हे करतांनाच प्रकरणातील ईतर वाहने सुध्दा ताब्यात घेण्याची मागणी समोर आली.यावर सबंधित वाहनाची चौकशी करून महसूल विभाग नियमानुसार कार्यवाही करणार काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.असे असतांना मात्र येथिल तलाठ्याकडून बचावपवीत्रा अवलंबिला जात आहे.पुरावे राहूनही मी लहान माणूस काही करू शकत नसल्याचे सांगून तलाठ्यानी आपली हतबलता बोलून दाखविली आहे.एवढेच नाही तर हे प्रकरण दाबण्यासाठी त्यांच्याकडे आलेले फुटेज तलाठ्याने अजूनपर्यंत तालुका प्रशासनाच्या सुपूर्त केले नसल्याची माहिती आहे.
डोंगरगाव-धाबा शिवारातील मुरमाच्या उत्खननाच्या परवानगी ३० ऑक्टोंबरपर्यंतच होती.मात्र मुदत संपल्यानंतरही येथिल खदानीवर उत्खनन आणि वाहतूक सुरूच होती.अश्यावेळी चुकीच्या पद्धतीने टिपीचा वापर करून धाबा मार्गावर शेकडो ब्रास मुरमाची वाहतूक केली गेली.१५ नोव्हेंबर रोजी खदानीवर हा प्रकार सुरू असतांनाच घटनास्थळावर जेसीबीचे वाहन पकडण्यात आले.ही वाहन पकडण्यापूर्वी त्याच खदानीवरून परवाना नसतांना पुन्हा एक जेसीबी व मुरुम भरलेली हायवा मोक्यावर थांबविण्याचा प्रयत्न केल्यानंतरही बळजबरीणे रवाना झाली.याही अगोदर हाच माल भरलेले दोन हायवा डोंगरगाव-धाबा रस्त्यावर दिसून आल्या.या घटनेनंतर चार दिवस लोटूनही अजूनपर्यंत महसूल विभागाने सदर प्रकरणातील ईतर वाहनावर कोठलीच कार्यवाही केली नाही.त्यामुळे महसूल विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.चौकशी अधिकारी असलेल्या त्यांच्या स्थानिक कर्मचाऱ्याकडे मोक्यावरील व्हिडीओ फुटेज आणि फोटो पुरावा सादर केल्यानंतरही अजूनपर्यंत याची कुठलीच दखल झाली नाही.याशिवाय त्यांच्या वरिष्ठांनाही हा गंभिर प्रकार न कळविता तलाठ्याने प्रकरण दाबण्याचा मनसुबा रचला असल्याचे चित्र आहे.तुमचे पुरावे मिळाले परंतु त्यावर मी काहीएक करू शकत नाही,तुम्ही हा विषय मोठ्या साहेबांकडे रेटा.सर्व ठीक असले तरी सध्या तरी मी या प्रकरणात अधिक काही करू शकणार नसल्याचे सांगतानाच तलाठी भदाडे यांनी आपली हतबलता बोलून दाखवली.वरिष्ठांपासून घटनेचा पुरावा लपविणे हा प्रकार चुकीचा असून यावर आता काय निर्णय होणार,याकडे परिसरातील जनतेचे लक्ष लागले आहे.
—————————————-
बॉक्स-१)

चौकशीला गेलेल्या वनकर्मचाऱ्यांना माघारी बोलविले

महसूल विभागाची कार्यवाही होण्यापूर्वी मुरमाच्या खदानीवर १५ नोव्हेंबर रोजी सकाळीच धाबा येथील वनपथक दाखल झाले होते.ही खदान वनजमिनीलगत आहे.त्या जागेवरील झाडेझुडपे तोडण्यात आली.याची कर्मचाऱ्यांनी चौकशी चालविली असता ही चौकशी पूर्ण झालीच नाही.मात्र खदानीत गेलेल्या वनकर्मचाऱ्यांना वरिष्ठांनी माघारी बोलविले.या प्रकाराची चर्चा आता परिसरात रंगू लागली आहे.
—————————————-
बाॕक्स :-२)

लोकप्रतिनिधी गप्प का ?
गोंडपिपरी तालुक्यात तीन सिंचन प्रकल्प आहेत.या प्रकल्पांचा तालुकावासियांना म्हणावा तेवढा लाभ झाला नाही.असे असतांना धाबा मार्गाच्या कंत्राटदाराने स्वताच्या लाभासाठी दरुर-किरमीरी या प्रकल्पाच्या नहराची एशितैशी केली.एवढा गंभिर प्रकार घडून देखिल कोणत्याही लोकप्रतीनिधींने यावर “ब्र” काढला नाही.यावरुन नेतेमंडळींची असंवेदनशिलता दिसून येते.यातच धाबा परिसर राजकीयदृष्या संवेदनाशिल माणला जातो.लहाणसहाण विषयावर या परिसरातील मंडळी अक्षरशः रान पेटवतात.मात्र शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या असलेल्या एवढ्या गंभिर मुद्यावर परिसरातील पुढाऱ्यांनी मौन बाळगल्याने सत्ताधारी आणि विरोधकांत “युती” तर झाली नाही ना ? असा सवाल विचारला जात आहे.