जितेंद्र गोहणे यांची गोंडपिपरी तालुका काँग्रेस च्या सोशल मीडिया प्रसिद्धी प्रमुख पदी निवड… आमदार श्री. सुभाषभाऊ धोटे यांचे हस्ते नियुक्तीपत्र…..

53

जितेंद्र गोहणे यांची गोंडपिपरी तालुका काँग्रेस च्या सोशल मीडिया प्रसिद्धी प्रमुख पदी निवड…

आमदार श्री. सुभाषभाऊ धोटे यांचे हस्ते नियुक्तीपत्र…..

जितेंद्र गोहणे यांची गोंडपिपरी तालुका काँग्रेस च्या सोशल मीडिया प्रसिद्धी प्रमुख पदी निवड... आमदार श्री. सुभाषभाऊ धोटे यांचे हस्ते नियुक्तीपत्र.....
जितेंद्र गोहणे यांची गोंडपिपरी तालुका काँग्रेस च्या सोशल मीडिया प्रसिद्धी प्रमुख पदी निवड…
आमदार श्री. सुभाषभाऊ धोटे यांचे हस्ते नियुक्तीपत्र…..

भिमराव देठे
भं तळोधी क्षेत्र ग्रामीण प्रतिनिधी
मो नं ८९९९२२३४८०

गोंडपिपरी:- दि.१४ नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर दरम्यान आमदार श्री. सुभाषभाऊ धोटे यांचे नेतृत्वात राजुरा विधानसभा क्षेत्रात विविध ठिकाणी केंद्र सरकारच्या दरवाढी विरोधात काँग्रेसचे जनजागरण अभियान मोहीम सुरु आहे.
दरम्यान १९ नोव्हेंबर व २० नोव्हेंबर ला गोंडपिपरी तालुक्यातील दरुर या गावी दोन दिवसाचा काँग्रेसचा जनजागरण अभियान सोहळा पार पडला.
गोंडपिपरी तालुक्यात सोशल मीडिया प्रसिद्धीच्या माध्यमातून काँग्रेसची विचारधारा,पक्षाची प्रबलता, काँग्रेसचे उपक्रम,विविध कार्यक्रम सोशल च्या माध्यमातून मांडत येत असलेले हिवरा येथील ग्रामपंचायतीचे सदस्य श्री. जितेंद्र गोहणे यांचेवर क्षेत्राचे आमदार व गोंडपिपरी तालुका काँग्रेसने विश्वास दाखवून राजुरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार श्री. सुभाषभाऊ धोटे यांचे हस्ते नियुक्ती पत्र देऊन श्री. जितेंद्र गोहणे यांची आज जनजागरण अभियान दरम्यान गोंडपिपरी तालुका काँग्रेसच्या सोशल मीडिया तालुका प्रसिद्धीप्रमुख पदी निवड करण्यात आली.
अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष मा. सोनियाजी गांधी यांचे हात बळकट करण्यासाठी व तालुक्यातील व विधानसभेतील काँग्रेस पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी आपल सहकार्य राहील आणि समोर काँग्रेस पक्षाला आपल्या सोशल मीडिया प्रसिद्धी च्या माध्यमातून यापेक्षाही उत्तम सहकार्य लाभेल अशी अपेक्षा गोंडपिपरी तालुका सोशल मीडिया प्रसिद्धीप्रमुख जितेंद्र गोहणे कडून तालुका काँग्रेस कमिटीने केल्या व निवडीबद्दल अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या…
प्रसंगी तालुकाध्यक्ष तुकाराम झाडे, सुरेशराव चौधरी, युवक अध्यक्ष संतोष बंडावार, प्रा. शंभूजी ये, अशोक रेचनकर, विनोद नागापुरे, नामदेव सांगळे, देविदास सातपुते, अनिल कोरडे,सचिन फुलझेले, सिंधू कंदनुरीवार,आशीर्वाद पिपरे, आनंदराव कोडापे, धीरेंद्र नागापुरे,यासह तालुक्याती कार्यकर्ते व गावकरी बहुसंख्येने उपस्थित होते.