कृषी कायदा: हा शेतकरी आंदोलनाचा विजय, जनता आता जनमतातुन सरकारला धडा शिकवनार: माजी खासदार प्रा. जोगेद्र कवाडे

✒ युवराज मेश्राम ✒
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
📲 9923296442 📲
नागपुर,दि.21 नोव्हे:- केंद्रातील मोदी सरकारने तीन कृषी कायदे परत घेतले आहे. त्यामूळे शेतक-या द्वारा सुरु असलेल्या आंदोलनाला मोठ यश प्राप्त झाल आहे. त्याच पार्श्वभूमीवर मिडिया वार्ता न्युजचे नागपुर जिल्हा प्रतिनिधी युवराज मेश्राम यांनी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष माजी खासदार प्रा. जोगेद्र कवाडे यांची घेतलीली मुलाखात.
देशात स्थिक स्थिकानी शेतकरी माघील 1 वर्षापासुन भारतीय संविधानाने प्रधान केलेल्या लोकशाही मार्गाने आंदोलन करणा-या शेतक-यांचा विजय झाला आहे. अशक्य अशा प्रदिर्घ काळ चाललेल्या शेतकरी आंदोलनाचा हा विजय आहे. मोदी सरकार शेतकरी विरोधी तीन काळे कायदे रद्द केल्याने हा लोकशाही व लोकभावनेचा विजय आहे. हा विजय मिळवण्यासाठी शेकडो शेतकरी बांधवाना बलिदान दयाव लागल हे त्या बलिदानाचा विजय आहे.
केंद्रातील मोदी सरकारने तीन काळे कृषी कायदे हे देशातील मुठ्ठभर भांडवलदाराच्या हिताचे होते शेवटी भांडवलशाहीला पराभूत करुन शेतक-यांचा जो विजय झाला तो ईतीहासीक थरलेला आहे. देशात झालेल्या विविध पोटनिवडणुका आणि भारतिय जनता पक्षाचे झालेले पानिपत त्यामूळे प्रधानमंत्री मोदी यांच्या लोकप्रियता घसरणीला लागल्याचे दिसून येते. पुढे येऊ घातलेल्या उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा निवडणुकीवर डोळा ठेऊन मोदीने घेतलेला निर्णय हा भिती पोटी घेतलेला आहे. असे असले तरी आणखी देशातील जनता मोदीचा भुलथापाना बळी पडणार नाही. संयुक्त किसान मोर्चाने घेतलेला निर्णय संसद मध्ये जो पर्यंत तिन्ही काळे कृषी कायदे रद्द केले जात नाही तो पर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्णयाचे मी आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टी स्वागत करतो.
शेतक-यांच्या हिताचे व कल्याणाचे कायदे करताना शेतक-यांना विश्वासात घेतल्या शिवाय करण्यात येऊ नये याचा पाठ शेतकरी आंदोलनाने सरकारला दिलेला आहे. संपुर्ण जगाचे लक्ष हे या प्रदिर्घ शेतकरी आंदोलनाकडे लागले होते. त्यामूळे जगातील लोकशाही प्रेमी लोकांनी या आंदोलनाला समर्थन दिले होते. शेतकरी आंदोलनामुळे सवैधानिक लोकशाहीला बळ प्राप्त झाले आहे.
पीपल्स रिपब्लिकन पक्ष नेहमी गरीब, शेतकरी, शेतमजुर, कामगार यांच्या हक्क अधिकार यांच्या आंदोलनात सहभागी झाले आहे. पुढे ही आम्ही हे आंदोलन सुरू ठेऊ जनतेला वेटीस धरना-या सरकारला जनता आपल्या जनमतातुन धडा शीकवनार आहे.
एसटी कर्मचा-यांचे आंदोलन…
पीपल्स रिपब्लिकन पक्षाचा एसटी कर्मचा-यांच्या मागणीला पाठिंबा आहे. आज एसटी कर्मचा-यांची अवस्था फार बिकट आहे. अनेक गैरसोयी आहे. हे सर्व सहन करत लालपरी द्वारा एसटी कर्मचारी जिवावर उधार हौऊन जनतेची सेवा करत आहे. आणि एसटी कर्मचारी यांची अनेक वर्षा पासून मागणी आहे एसटीचे विलिनिकरण करुन शासकीय सेवेतील चतुर्थ सेवेतील दर्जा प्राप्त व्हावा. ही न्याय उचित मागणी आहे. त्यामूळे सरकारने कुठलाही वेळ न गमावता एसटी कर्मचा-यांचे विलीनीकरणाचा निर्णय लवक-यात लवकर घ्यावा.