नागभीड नगर परिषदेचा भ्रष्टाचार उघडकीस/कारवाही करण्याची मांगणी

47

नागभीड नगर परिषदेचा भ्रष्टाचार उघडकीस/कारवाही करण्याची मांगणी

नागभीड नगर परिषदेचा भ्रष्टाचार उघडकीस/कारवाही करण्याची मांगणी
नागभीड नगर परिषदेचा भ्रष्टाचार उघडकीस/कारवाही करण्याची मांगणी

✒अरुण भोले✒
नागभीड तालुका प्रतिनिधी
94033 21731

नागभीड : -नागभीड नगर परिषदेच्या प्राप्त झालेल्या लेखापरीक्षण अहवालाच्या तफवतीनुसार अग्निशमन खरेदीत अनियमितता असून परवानगी विनाच खरेदी रद्द झाल्याचे लेखा परीक्षण अहवालात नमूद करण्यात आले आहे .या प्रकरणी दोषींवर जोपर्यंत पोलीस कारवाई होत नाही तोपर्यंत नगर परिषदेतील विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या नगरसेवका कडून लढा दिला दिला जाणार असल्याची माहिती काँग्रेसच्या नगरसेवकांनी पत्रकर परिषदेत दिली . नागभिड येथील काँग्रेस कार्यालयात यासंदर्भात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत नगर परिषद नागभिड येथील प्राप्त झालेल्या लेखापरीक्षण अहवालात अनेक विषयावर व विविध खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे .नागभीड नगरपरिषद कडून अग्निशमन वाहन खरेदी करिता देवी फायर सर्विसेस सोलापूर यांना ७२९९००० प्रधान केलेले आहेत .सदर खरेदीची प्रक्रिया संबंधित अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता त्यावर वाहन खरेदी करिता जिल्हाधिकारी चंद्रपूर यांची प्रशासकीय मान्यता घेतली नाही .त्यामुळे प्रशासकीय मान्यतावीना केलेला ७२९९००० चा खर्च मान्य करण्यात आला नाही त्यामुळे संबंधितांवर कारवाई होणे आवश्यक आहे असेही अहवालात नमूद आहे. शासन निर्णय 17 ऑक्टोंबर 2018 नुसार अग्निशमन केंद्राचे बांधकाम करिता ५००१८०७/- व अग्निशमन वाहन खरेदी करिता २९९८१९३ असे एकूण ८०००००० रुपयाच्या खरचास मान्यता प्रदान करून 80 टक्के शासन हिश्याची रक्कम रुपये ६४०००००एवढ्या रक्कमे्स प्रशासकिय मान्यता प्रदान केलेली आहे .म्हणजेच वाहन खरेदी करता शासनाने मान्य केलेल्या एकूण २९,९८,१९३पेक्षा जास्त केलेला खर्च रुपये४३००८०७संबधितांकडून कडून वसूल करणे आवश्यक आहे. असेही अहवालात नमूद आहे. वाहन खरेदी च्या ८० टक्के रकमेला शासनाने प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे .म्हणजेच उर्वरित 20 टक्के रकमेला प्रशासकीय मान्यता व प्रत्यक्ष खरेदी ७२९९००० ला प्रशासकीय मान्यता घेतलेली नाही त्यामुळे विसंगती व झालेल्या नियमबाह्यते बाबत समप्रमाण अनुपालन सादर करावे अन्यथा प्रशासकीय मान्यता न घेताच खरेदी केलेल्या संबंधितावर कारवाई होणे आवश्यक आहे असे अहवालात नमूद आहे. नगर परिषदेने नियमाप्रमाणे ई निविदा प्रक्रिया पूर्ण केली नाही त्यामुळे सदर नियमातील निविदा प्रक्रिया रद्द होणे आवश्यक आहे .अंदाजपत्रकिय दर नमूद न करता निविदा प्रक्रिया पूर्ण करणे नियमबाह्य आहे व कंत्राटदाराकडून आले तर योग्य असल्याबाबत शासनाच्या संबंधित अग्निशमन सेवा विभागाकडे याची खात्री न करताच मे.देवी फायर यांना रुपये ७२९९०००/-एवढ्या जास्त किमतीच्या कार्यादेश दिलेला आहे .नगरपरिषदेने चुकीच्या व नियमबाह्य रीतीने निविदा प्रक्रिया राबविल्यामुळे जास्त दराने प्रदान होऊन शासन महसुलाचे हानी झाल्यामुळे त्यावर कारवाई निश्चित करून जास्त प्रदान केलेली रक्कम वसूल करणे आवश्यक आहे असेही अहवालात नमूद आहे. मोटार वाहन खरेदी अधिनियमानुसार मॉडल खरेदी करणे आवश्यक होते ,परंतु नगरपरिषदेच्या कारभाऱ्यांनी नियमाचे उल्लंघन करून हेतूपुरस्पर दुर्लक्ष करून तातडीने प्रदूषणास जबाबदार असणारे वाहन खरेदी केले आहे असाही आरोप करण्यात आला आहे. नागभीड नगर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा व अधीकाराचा दुरूपयोग करून सदर वाहन तातडीने खरेदी केले आहे .त्यामुळे संबंधितावर नियमाप्रमाणे कारवाई होणे आवश्यक आहे ,अशी मागणी करण्यात आली आहे .पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेस नगरसेवक गटनेता संजय अमृतकर, प्रतिक भशीन ,सोनाली दांडेकर, सुनंदा माटे, धनश्री काटेखाये ,सारिका धारणे उपस्थित होते