जळगांव जिल्हा बँक निवडणूक: गुलाबराव देवकरांकडून विरोधकांचा पुरता धुव्वा.

जळगांव प्रतिनिधी खंडू महाले
जळगाव:- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत इतर सहकारी संस्था व व्यक्ती मतदार संघातून सहकार पॅनलचे नेते व माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी विरोधकांचा पुरता धुव्वा उडवला आहे. सोळाशे पाच एवढी विक्रमी मते घेऊन श्री देवकर यांनी या निवडणुकीत बाजी मारली आहे. विरोधकांना दोनशेचा टप्पा सुद्धा गाठता आलेला नाही.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनलचे प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर काही बंडखोरांनी मिळून शेतकरी पॅनलची घोषणा केली होती. तर भाजपने निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे महाविकासआघाडीने आपले पॅनल मैदानात उतरवले होते. जिल्हा बँकेची निवडणूक ही सहकार क्षेत्रातील सचोटीच्या कार्यकर्त्यांची निवडणूक असते, येथे पैशांची मात्रा लागू पडत नाही, म्हणूनच भाजपने माघारीचे ढोंग रचून निवडणुकीवर बहिष्कार घातला. आणि बंडखोरांना शेतकरी पॅनलच्या माध्यमातून रसद पुरवण्याचा प्रयत्न केला. पण सहकाऱाशी एकनिष्ठ असलेल्या सहकार पॅनलच्या उमेदवारांनी सर्व बंडखोरांचा पराभव करून भाजपलाही तोंडघशी पाडले आहे. यात माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील यांची यांची रणनीति सरस ठरली आहे.
श्री देवकर यांची सहकार क्षेत्रातील तीस वर्षांची सेवा ही मतदारांच्या मनातून जाणे शक्य नाही, त्यामुळेच त्यांच्या विरोधकांना दोनशेच्या आत रोखत 1605 मते मिळवून देवकरांनी प्रचंड मोठा विजय संपादन केला आहे.